निवडणुकीच्या रणधुमाळीत अनेकांना मिळाला रोजगार

शेती कामास मजूर मिळेनात . हॉटेल, ढाबेफुल.मंडप,खुर्च्यांना आले डिमांड
वाशिम जिल्हा प्रतिनिधी
अजय गायकवाड
मालेगाव: निवडणुकीच्या रणधुमाळीत दररोज लाखोंची आर्थिक उलाढाल होत असून हजारो हातांना काम मिळाले आहे.
मंडप व्यवसायिकांसह, ऑटो रिक्षा,सायकल रिक्षा,डिझायनर्स, बॅनर,प्रिंटर्स, स्टिकर्स,फ्रेम,मेकर्स, पोम्प्लेट झेंडे बनवणारे त्याचबरोबर झेरॉक्स मशीन वाल्यांना आणि लहान व्यवसायिकांना देखील रोजगार मिळाला आहे.
दरम्यान सध्या शेतीकामास मजुराची वाणवा झाली असून हॉटेल धाबे गर्दीने गच्च भरल्याचे चित्र दिसून येत आहे
महिनाभरापासून सुरू असलेला दिवाळीचा फीवर आता कमी होऊ लागला आहे तरी दुसरीकडे निवडणुकीचे फटाके जोरात फुटत आहे सध्या निवडणुकीची रणधुमाळी जोरात सुरू असल्याने मोठ्या प्रमाणावर आर्थिक उलाढाल होऊ लागली आहे
छोट्या छोट्या घटकातील लोकांना एकीकडे रोजगार मिळत असला तरी दुसरीकडे रोज काबाडकष्ट करणारे मजूर आता मजुरी करताना दिसत नाही मजूर पाहून पण कामासाठी परिसरात मजूर सापडत नसल्याची परिस्थिती सध्या दिसून येत आहे.
सध्या मंडप खुर्च्या व साऊंड सिस्टम वाल्यांना निवडणुकीमुळे मोठे डिमांड आल्याने त्यांच्या आर्थिक उलाढाल होत असल्याचे पहावयास मिळत आहे तसेच आपल्या नेत्याचे स्वागत व गाव खेड्यात आगमन होताच त्याच्या स्वागतासाठी लागणारी फेटे, हार,बोके आणि फुलांना सोन्यासारखे भाव झाल्याचे दिसून येत आहे
या व्यवसायिकांना सुद्धा सुगीचे दिवस आले आहेत तर निवडणुकीच्या अनुषंगाने प्रचाराच्या सभा घेण्यासाठी मंडप खुर्च्या साऊंड सिस्टम भोंगे आदी साहित्य लागते याशिवाय सभा सभा वाटत नाही म्हणून मंडप खुर्च्या वाल्यांना पण देखील भाव आला आहे. तसेच काही दिवसापूर्वी जेवणवळीच्या ठिकाणी तुरळक ग्राहक होते
पण सध्या निवडणुका लागल्याने दुपारी व संध्याकाळपर्यंत ठीक ठिकाणी च्या हॉटेल्स,ढाब्यावर, खूप गर्दी होताना दिसत आहे ही गर्दी अचानक झाल्याने जेवणवळी वाले देखील कमी पडू लागल्याचे चित्र दिसून येत आहे.



