जळगावा जिल्हा

सिलेंडरच्या स्फोटात चारचाकी वाहनासह एक दुचाकी जळून खाक, १० जण गंभीर जखमी!

जळगाव जिल्हा प्रतिनिधी :- शहरातील इच्छादेवी चौकात चारचाकी वाहनांमध्ये घरगुती गॅस भरत असताना सिलिंडरचा स्फोट झाला.या स्फोटात चारचाकी वाहनासह एक दुचाकी जळून खाक झाली. तर १० जण गंभीर जखमी झाले.

शहरातील इच्छादेवी चौकातील एमआयडीसी पोलीस चौकीच्या बाजूला असलेल्या एका पत्राच्या शेडमध्ये चारचाकी वाहनात घरगुती गॅस भरत असताना अचानकपणे सिलिंडरचा स्फोट झाल्याने भीषण आग लागली. वाहनाजवळ उभे असलेले आणि वाहनात बसलेले असे एकूण १० जण गंभीर जखमी झाले.
तसेच चारचाकी वाहन आणि एका दुचाकीने पेट घेतल्याने दोन्ही वाहने जळून खाक झाली. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर जळगाव महापालिकेचे दोन अग्निशमन बंब घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर ही आग आटोक्यात आणण्यात आली, या भीषण आगीत भाजले गेलेल्या जखमींना तातडीने शासकीय वैद्यकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button