Uncategorized

उमेदवारांकडून मतदारांवर प्रभाव टाकण्याचे प्रकार टाळण्यासाठी सतर्कता बाळगा -निवडणूक निरीक्षक

वाशिम जिल्हा प्रतिनिधी
अजय गायकवाड

वाशिम : – मतदानाची टक्केवारी वाढविण्यावर विशेष लक्ष देण्याचे निर्देश देत, शेवटच्या मतदारापर्यंत सुविधा पोहोचवण्यासाठी नियोजन करण्यावर भर देण्यात यावा. निवडणूक काळात काही उमेदवारांकडून मतदारांवर प्रभाव टाकण्याचे प्रकार टाळण्यासाठी सतर्कता बाळगण्याची सूचना निवडणूक निरीक्षक अनिलकुमार झा यांनी दिल्या आहेत.
या बैठकीत जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस यांनी वाशिम जिल्ह्यातील मतदान व्यवस्थेबाबत माहिती दिली. लोकसभा निवडणुकीत मतदान सुरळीत पार पडल्याचे सांगत, या निवडणुकीतही तसाच आदर्श प्रस्थापित करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील असे त्यांनी सांगितले. या बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव वाघमारे, अप्पर जिल्हाधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी राम लंके, उपजिल्हाधिकारी श्री. दराडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी किरण कोवे, जिल्हा सुचना व विज्ञान सागर हवालदार, शिक्षणाधिकारी योजना गजानन डाबेराव आदी उपस्थित होते. निवडणूक निरीक्षक अनिल कुमार झा यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित केलेल्या बैठकीनंतर सीविजील आणि जिल्हा माहिती कार्यालयातील माध्यम प्रमाणीकरण व माध्यम सनियंत्रण समितीच्या माध्यम कक्षास भेट दिली. या भेटीदरम्यान जिल्हा माहिती अधिकारी यासेरोद्दीन काझी यांनी माध्यम कक्षाचा कामकाजाबाबत निवडणूक निरीक्षकांना सविस्तर माहिती दिली. तसेच सिविझिल कक्षात नोडल अधिकारी अजिंक्य वानखेडे यांनी सिव्हिजिल कक्षाच्या कामकाजाबाबत सविस्तर माहिती प्रदान केली. निवडणूक निरीक्षक अनिलकुमार झा यांचे संपर्क साधण्याचे आवाहन आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर निवडणुकीत पारदर्शकता आणि शिस्तबद्धता राखण्यासाठी सामान्य निवडणूक निरीक्षक अनिलकुमार झा यांनी नागरिकांनी सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन केले आहे. निवडणुकीदरम्यान कोणतीही समस्या, शंका किंवा सूचना असल्यास त्यांनी नागरिकांसाठी दूरध्वनी क्रमांक ०७२५२-२९९३८२ शेअर केला आहे. निवडणूक प्रक्रियेची विश्वासार्हता वाढवण्यासाठी नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे अनिलकुमार झा यांनी सांगितले.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button