पंचगव्हाण ता. तेल्हारा येथे घडते हिंदू मुस्लिम एकतेचे दर्शन,! पोलिसांच्या चोख बंदोबस्तात आनंदात पार पडतो बाबांचा संदल!

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस विजय घोडे तेल्हारा तालुका प्रतिनिधी
पंचगव्हाण 18 ऑक्टो. 2024| होय अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तहसील अंतर्गत येणारे पंचगव्हाण हे प्रसिद्ध ठिकाण असून पंचगव्हाण नरसीपुर येथे हजरत मीर सय्यद युसुफ दादा नेकनाम यांचा सुप्रसिद्ध दर्गा आहे बाबा नेकनाम यांच्यावर असंख्य भाविकांची निसिम श्रद्धा असून येथे हिंदू-मुस्लिम-बौद्ध आदी धर्मातील हजारो भाविक दरवर्षी पंचक्रोशीतून दर्शनाकरिता येत असतात बाबा नेकनाम यांच्या दर्शनाने भक्तांची मनोकामना पूर्ण होते असा भाविकांचा समज आहे. दि. 14 ऑक्टोंबर 2024 रोजी बाबा नेकनाम यांचा 438 वा उरूस भाविकांकडून मोठ्या जल्लोषात साजरा केला गेला . बाबा नेकनाम यांचा उरूस सुरू होण्याआधीच आठ दिवसापासून यात्रेमध्ये आपले स्टॉल लागले पाहिजे या हेतूने दुकानदार मोठ्या उत्साहाने येथे येतात व आपली दुकाने लावतात. हा उत्सव प्रारंभ होण्याआधी अलेहसुन्नत शाही मस्जिद येथील हजरत मीर सय्यद युसुफ नेकनाम दर्ग्यावर पंच कमिटीच्या व अध्यक्षांच्या वतीने फुलांची चादर बाबांना मोठ्या सन्मानाने चढवण्याची परंपरा असून यानंतर नरसीपुर येथील शाही मस्जिद येथून शाही संदल ला सुरुवात होऊन बाबांचा उरूस पण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो बाबांच्या शाही संदल मिरवणुकीचा मार्ग नरसीपुर , खेल-सटवाजी , खेल-कृष्णाजी असा असून या संदल ,मिरवणुकीचा समारोप बाबा नेकनाम यांच्या दर्ग्यावर केला जातो . हा उत्सव साजरा करण्यासाठी असंख्य भाविक, गावकरी परिश्रम घेतात. यावर्षीचा हा उत्सव निर्विघ्न पार पाडण्याकरिता तेल्हारा पोलीस स्टेशनचे ठाणेदार उलेमाळे साहेब यांनी उत्सवापूर्वीच पंचगव्हाण येथे भेट दिली होती. ठाणेदार उलेमाळे साहेब यांच्या मार्गदर्शनात बीट जमदार सोळंके साहेब , इंगळे साहेब , उपनिरीक्षक निलेश ठाकरे यांनी चोख बंदोबस्त ठेवला असून उत्सवा दरम्यान विशेष व्यवस्था शाही मज्जिद अध्यक्ष अब्दुल अजीज नाजा साहब आणि त्यांच्या ट्रस्टच्या वतीने केल्या गेली. या उत्सवाला गावांमधील नागरिक , भाविक मंडळी तसेच पोलीस प्रशासनाचे विशेष सहकार्य लाभले , ही माहिती पार्किंग कमिटीचे मोहम्मद हुसेन मोहम्मद हसन , शेख नासिर शेख मुस्ताक , अफरोज खान रसूल खान व ट्रस्ट यांच्या वतीने प्राप्त झाली आहे.










