वैद्यकीय

मळणी यंत्र सावध पुणे काळजी पूर्वक हाताळा.डॉ. रवि पोफळे .

वाशिम जिल्हा प्रतिनिधी
अजय गायकवाड

मालेगाव : – सद्यस्थित सोयाबीन काढणीला वेग आला असून मागील काही वर्षात मळणी यंत्राने सोयाबीन काढतांना अनेक शेतकऱ्यांची जीवित हाणी अथवा कायम अपंगत्व आल्याच्या घटना घडत आहेतच त्यामुळे विशेष काळजी घ्यावी.
सोयाबिनची काढणी करताना शेतकऱ्यांनी मळणीयंत्रापासून विशेष काळजी घ्यावी असे आवाहन येथील डॉ. रवि पोफळे यांनी केले आहे. या बाबत प्रस्तुत प्रतिनिधीशी बोलताना डॉ. रवि पोफळे म्हणाले, की शेतकरी हे देशाचे अन्नदाते आहेत. अत्यंत कष्टाने शेतमाल पिकवितात. अस्मानी सुल्तानी संकटांचा सामना करतात. उन-वारा- पाऊस याची तमा न बाळगता पोटच्या मुलाप्रमाणे पिकाची काळजी घेतात. त्यांनी स्वतः च्या जीवाकडेही लक्ष देणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांनी सोयाबिन काढणी वेळी मळणीयंत्रापासून सावध राहावे. काढणी वेळी इतर कोणत्याही गोष्टीचा विचार करू नये. विचारांच्या तंद्रीत दुर्घटना घडत असतात असे मत डॉ. रवि पोफळे यांनी व्यक्त केले आहे. ते म्हणाले, की दरवर्षी मळणी यंत्राने सोयाबीन काढणीच्या वेळी एक दोन घटना घडतात व मळणीयंत्रात अडकून हात , बोटे जिव सुध्दा गेल्याच्या घटना घडल्या आहेत. असे प्रसंग कोणावरही ओढावू नयेत. यासाठी शेतकरी व मळणीयंत्र व्यावसायिकांनी विशेष काळजी घ्यावी. महिलांनी साडीचा पदर व्यवस्थित सांभाळावा. शेतकरी स्त्री-पुरुषांनी घाई न करता अत्यंत सावधानतेने सोयाबिनची काढणी करावी. असे आवाहन डॉ. पोफळे यांनी बळीराजाला केले आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button