Uncategorized

महिला आर्थिक विकास महामंडळाला राष्ट्रमाता जिजाऊ नाव दया.- उषा जाधव यांची खा. श्रींकात शिंदे यांच्या कडे मागणी

वाशिम जिल्हा प्रतिनिधी
अजय गायकवाड

मालेगाव : – येथील जनसंवाद मेळाव्यात मुख्यमंत्री शिंदे यांचे चिरंजीव तथा खा. श्रींकात शिंदे यांना महिला आर्थिक विकास महामंडळाला राष्ट्रमाता जिजाऊ यांचे नाव देण्यात यावे अशी मागणी करण्यात आली.
अखील भारतीय कैकाडी महासंघाचे महिला विदर्भ अध्यक्ष तथा माजी जि प सदस्य उषा जाधव यांनी लेखी निवेदन द्वारे मागणी केली असून या कार्यक्रमाला कार्यक्रमाच्या आयोजक आ. भावना गवळी, केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव, यांच्या सह आमदार, खासदार, व शिवसेना प्रमुख, व मान्यवरांनी उपस्थिती लाभली होती, उषा जाधव यांनी दिलेल्या निवेदनात नमूद केले होते की, राष्ट्रमाता जिजाऊ यांचा आदर्श महाराष्ट्राने नव्हे तर संपूर्ण देशाने घेण्यासारखा आहे, राज्यात महिला आर्थिक विकास महामंडळ अंतर्गत महिलांच्या विकासासाठी विविध प्रकारच्या योजना राबविल्या जातात, या योजनेअंतर्गत राज्यातील महिलांचे सक्षमीकरण करण्यात येत आहे, राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या आशिर्वादाने महिलांच्या सर्वांगिन विकासाला खऱ्या अर्थाने गती मिळाली असून, राज्यात महिला आर्थिक विकास महामंडळा अन्तर्गत महीलांना आर्थिक बळ पुरवण्याचे काम केले जात आहे, त्यामुळे महिला आर्थिक विकास महामंडळाला स्वराज्य संकरलिका राष्टमाता जिजाऊ यांचे नाव देण्यात आले पाहिजे यासाठी आपण शासनाकडे पाठपुरावा करावा अशी मागणी उषा जाधव यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button