Uncategorized

मुख्याध्यापकानी नामांकित पत्रकाराला दीड दिवसाचा पत्रकार म्हणून हिणवले..

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाकडून संबंधितांवर कार्यवाही ची मागणी

लिंगा कोतवाल येथिल जिल्हा परिषद शाळेतील प्रकार

वाशिम जिल्हा प्रतिनिधी
अजय गायकवाड

रिसोड : – रिसोड तालुक्यातील लिंगा कोतवाल येथील जिल्हा परिषद शाळेत टी सी मागाण्यासाठी गेलेल्या ABK NEWS चे उपसंपादक तथा पत्रकार प्रदिप देशमुख यांनी शाळेत गैर हजर असलेले मुख्याध्यापक भारत राजाराम बोरकर यांना फोन करून संपर्क केला असता त्यांनी पत्रकार प्रदिप देशमुख यांना दिड दिवसाचा पत्रकार म्हणून हिणवले.व पत्रकार प्रदिप देशमुख यांना सांगितले की तुम्हाला कुठेही माझी तक्रार करायची असेल तर करा जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या कडे सुद्धा करा असे मुख्याध्यापक बोलले.
शाळेत फक्त एकच शिक्षीका हजर होत्या.शिक्षिका यांना विचारले की मुख्याध्यापक साहेब कुठे आहेत त्यांनी सांगितले की रजेवर आहेत त्यानंतर कुठलीही रजा न टाकता सर सुट्टीवर गेलेले आहेत असे सांगून त्यांनी टाळाटाळ केली.पत्रकार प्रदिप देशमुख यांच्याशी अरेरावीची भाषा या मुख्याध्यापकानी केली.त्यांना पत्रकारांनी विचारले की सर आपला शाळेचा टाईम कितीचा आहे तर त्यांनी सांगितले की तुम्ही ऑफिसला जाऊन विचारा माझ्याकडे कुठला मॅसेज नाही मी तुम्हाला सांगू शकत नाही. जर असे मुख्याध्यापक भाषा बोलत असतील तर सर्वसाधारण लोकांच काय होणार त्यामुळे महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघटनेने तात्काळ दखल घेत गटशिक्षण अधिकारी यांना निवेदन देऊन संबंधित मुख्याध्यापक भारत राजाराम बोरकर यांच्यावर कार्यवाही करावी.जिल्हाध्यक्ष निनाद भाऊ यांच्या मार्गदर्शनाखाली व तालुका अध्यक्ष अरुण भाऊ श्रीरसागर यांच्या सुचनेनुसार हे निवेदन देण्यात आले,यावेळी उपस्थित शहराध्यक्ष प्रदिप खंडारे,रामेश्वर भाऊ रंजवे,प्रदिप देशमुख,संतोष जुमडे,व पदाधिकारी सदस्य मंडळी उपस्थित होते.या शिक्षण अधिकारी या मुख्याध्यापका वरती का कार्यवाही करतात या कडे लक्ष लागले आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button