आम्ही बँका, कारखाने, सरकार बुडवले….आम्ही कोटीने लुटले, तुम्हाला अनुदान नाही भेटले !

- शेतकरी मेळाव्यात सदाभाऊ खोत यांचे वक्तव्याने खळबळ वाशिम जिल्हा प्रतिनिधी
अजय गायकवाड
वाशिम : – आम्ही बँका बुडवल्या, कारखाने बुडवले, सरकार बुडावलं, आम्ही दहा कोटी- विस कोटी हाणतोय अन तुम्ही पाच हजार अनुदान मागताय. असा सवाल शेतकऱ्यांना करत सदाभाऊं खोत यांनी विदर्भातील जनतेसमोर पश्चिम महाराष्ट्रातील नेत्यांचे वास्तव मांडले.
रिसोड तालुक्यातील नधांना येथे रयत क्रांति संघटनेच्या शेतकरी मेळाव्या दरम्यान महायुतीचे नेते सदाभाऊ खोत बोलत होते. त्यांच्या या खळबळ जनक वक्तव्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. यावेळी सभामंचावर महायुतीचे नेते विधान परिषद सदस्य भावना गवळी, माजी आमदार विजय जाधव आणि वाशीम जिल्ह्यातील पुढारी उपस्थित होते.
रिसोड विधानसभा मतदारसंघातील नधांना गावात रयत क्रांतिचे संस्थापक अध्यक्ष सदाभाऊ खोत एका शेतकरी मेळाव्यात आले होते. या मेळाव्यात सदाभाऊंनी पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भाची तुलना
करतांना अजब वक्तव्य केले. ते म्हणाले आम्ही बँका बुडवल्या, कारखाने बुडवले, सरकार बुडवलं, आम्ही दहा कोटी-विस कोटी हाणतोय अन तुम्ही पाच हजार अनुदान मागताय. असा सवाल शेतकऱ्यांना करत विदर्भातील जनतेला सदाभाऊने पश्चिम महाराष्ट्रातील नेत्यांचे वास्तव सांगितलंय.
पुढे बोलताना सदाभाऊ म्हणाले लढावू माणसं विदर्भात आहे. ही माणसं जपा विदर्भातील नेतृत्व मोठं करा. तुम्ही आमच्याकडे मोठं करायला येऊ नका आमचे गडी लय मोठे आहेत. आम्ही बँका बुडवल्या, कारखाने बुडवले, सरकार बुडावले, आम्ही जेव्हडं हाणता येईल तेव्हड आम्ही हाणलया ,आणि तुम्ही काय मागताय फक्त अनुदान पाच हजार द्या, दहा हजार द्या विस हजार द्या. आम्ही किती हाणतोया दहा कोटी,पंधरा कोटी, विस कोटी आमचं कोटीत चाललंय अन तुमचं हजारात. त्यामुळे कशी गरिबी दूर होईल असा प्रश्न सदाभाऊंनी सभे मध्ये उपस्थित केला आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे शेतकरी मेळाव्यात टाळ्याचा कडकडाट झाला.
वाशिम जिल्ह्याच्या दौऱ्यावर असलेले आमदार सदाभाऊ खोत माजी कृषी राज्यमंत्री तथा संस्थापक अध्यक्ष रयत क्रांती संघटना ह्यांनी नंधाना येथील शेतकरी मेळाव्या नंतर च्या दौऱ्यात मुंगळा व मेडशी मंडळा मध्ये अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकाचे मोठे नुकसान झाले. धारपिंप्री या गावात शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली व शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या. शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई देण्याची मागणी केली .यावेळी माजी कृषी राज्यमंत्री व आमदार सदाभाऊ खोत,
मेडशी या गावांमध्ये त्यांनी शेतकरी बांधव तसेच मेडशी दुर्गम भागातील गरीब आदिवासी समाजातील लोकांनची भेट घेऊन नागरिकांच्या शेतीविषयक विविध प्रश्नावर व समस्या,चर्चा करून मेडशी येथील पाणीमापक यंत्रणा बिघाड विषयी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी भ्रमणध्वनी द्वारा नागरिका समक्ष चौकशी केली तथा इतर शासकीय योजनेच्या लाभा बदल माहिती ची विचारपूस करून शासकीय व शेती विषयक कामाच्या काही ही समस्या उद्भवल्यास मी खंबीरपणे नेहमी आपल्या पाठीशी उभा राहीन. असे आश्वासन देऊन. शेतकरी वर्ग, आदिवासी तसेच इतर समाजातील नागरिकाशी चर्चा केली.
चौकट
सदाभाऊंनी स्वतःच्या करतूत्वाची कबूली तर दीली नाही ना…….
सदाभाऊनी हे वक्तव्य नेत्यांबद्दल खरोखरच केले की स्वतःचे कारनामे तर सांगितले नाही ना, कारण ते काय कमी नाहीत बुडवला, कडकनाथ कोंबडीचा घोटाळा सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे. त्यात किती शेतकऱ्यांना बुडवलं हे सदाभाऊनी सांगायला पाहिजे होतं. त्यामुळे असं वाटते की नधांना येथील शेतकरी मेळाव्यात केलेलं वक्तव्य हे त्यांचा स्वतःचा अनुभव तर कथन केला नाही ना. सदाभाऊनी एक प्रकारे मेळाव्यातील जनतेसमोर स्वतःच्या कारनाम्याची कबुली तर दीली नाही ना ? असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित झाला आहे.



