तेल्हारा शहरात “स्वच्छता ही सेवा” अभियानांतर्गत सफाई कर्मचाऱ्यांची करण्यात आली आरोग्य तपासणी!

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस विजय घोडे तेल्हारा तालुका प्रतिनिधी
तेल्हारा 30 सप्टेंबर | केंद्रीय गृहनिर्माण तथा शहरी कार्य मंत्रालय भारत सरकार, यांचे निर्देशानुसार राष्ट्रपिता महात्मा गाधीजींना त्यांच्या जयंती दिनानिमित्त आदरांजली अपर्ण करण्यासाठी ०२ ऑक्टोबर हा दिवस स्वच्छ भारत दिवस म्हणून साजरा केला जातो. त्याची पूर्वतयारी म्हणून, स्वच्छ भारतासाठी स्वयंप्रेरणा आणि सामूहिक कृतीला बळकटी देण्यासाठी २०१७ पासून वार्षिक स्वच्छता ही सेवा (SHS) पंधरवडा साजरा केला जात आहे. तरी यावर्षी दि. १४ सप्टेंबर, २०२४ ते दि.०१ ऑक्टोबर २०२४ दरम्यान “स्वच्छता ही सेवा (SHS)” पंधरवडा आयोजित करण्यात आला असून, या वर्षी “स्वभाव स्वच्छता-संस्कार स्वच्छता” हे अभियान न.प.कार्यक्षेत्रात राबविण्यात येत आहे.सदर अभियांनातील स्वच्छता की भागीदारी व संपूर्ण स्वच्छता या घटकाअंतर्गत स्वच्छते विषयी जनजागृती करणे तसेच शहरातील जास्त कचरा असलेल्या ठिकाणांची(CTUs) ची सखोल स्वच्छता करणे हा मुख्य उद्देश आहे.
तरी सदर अभियानाअंतर्गत मुख्याधिकारी सतीश गावंडे यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील ग्रामीण रुग्णालय येथे सफाई मित्र सुरक्षा या घटकाअंतर्गत सर्व सफाई कामगारांची आरोग्य तपासणी करण्यात आली. सदर तपासणीमध्ये बी.पी ,शुगर , इ.सी.जी इत्यादी तपासण्या करण्यात आल्या. यावेळी वैद्यकीय अधीक्षक मनोज पेंदाम, स्वप्निल कोकाटे, शहर समन्वयक मंगेश डोरले तसेच सर्व वैद्यकीय अधिकारी, न.प.कर्मचारी, सफाई कामगार, नागरिक आदी बहुसंख्येने उपस्थित होते.






