जळगावा जिल्हा

सुप्रीम कॉलनी परिसरातील दुकानातून १० किलो प्लॉस्टीक जप्त ; दुकान मालकांना ठोठावला दंड

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस प्रतिनिधी

साईमत/जळगाव/प्रतिनिधी :

स्वच्छ भारत अभियान अंतर्गत शहरात विविध कार्यक्रम राबविले जात आहे. याच मोहिमेत कमी माईक्रॉनच्या प्लास्टीकचा वापर बंद करावा, यासाठी आकस्मिक पाहणी करण्यात आली. यात आरोग्यास अपायकारक प्लास्टीक वापर होत असल्याचे दिसून आले. महापालिकेच्या आरोग्य विभागाचे पथकाने सुप्रीम कॉलनी परिसरातील दुकानातून १० किलो कमी मायक्रॉनच्या प्लास्टीक जप्त करत दुकान चालकास ५ हजार रुपये दंड करण्यात आला.

सदर कारवाई गुरुवारी दि. २६ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास सुप्रीम कॉलनी येथील अपना स्वीट या दुकानात करण्यात आली. दुकानातून सुमारे १० किलो कमी मायक्रॉनच्या प्लॉस्टीक पिशव्या आढळून आल्या त्या जप्त करून दुकान चालकास ५ हजार रुपये दंड करण्यात आला.
सदर कारवाई महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाचे  प्र. सहाय्यक आयुक्त उदय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्य स्वच्छता निरीक्षक जितेंद्र किरंगे, आरोग्य निरीक्षक मनोज राठोड व मुकादम यांनी केली.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button