Uncategorized

श्री शिवाजी हायस्कूल तेल्हारा येथील मुलींचा कबड्डी संघ जिल्हा स्तरावर!

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
विजय घोडे
तेल्हारा ता. प्रतिनिधी

तेल्हारा. दि. २५ सप्टेंबर |
अकोला जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय अकोला व डॉ गोपाळराव खेडकर महाविद्यालय तेल्हारा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तेल्हारा तालुका शालेय कबड्डी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती या स्पर्धा मध्ये श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती द्रारा संचालित श्री शिवाजी हायस्कूल तेल्हारा येथील मुलींच्या कबड्डी संघाने अंतिम फेरीत शनिवार दि. २१ सप्टेंबर २०२४ रोजी घवघवीत यश प्राप्त केले आहे.
लवकरच अकोला जिल्हा स्तरावरील होणार्या कबड्डी स्पर्धामध्ये हा मुलींचा संघ तेल्हारा तालुका चे नेतृत्व करणार आहे. घवघवीत यश संपादित केलेल्या विजयी संघाचे अभिनंदन हर्षवर्धनजी देशमुख साहेब अध्यक्ष श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती , Adv. गजाननराव पुडकर उपाध्यक्ष , केशवराव मेतकर उपाध्यक्ष , सुरेशदादा खोटरे साहेब कार्यकारिणी सदस्य, व सर्व कार्यकारिणी सदस्य, प्राचार्य अण्णा साहेब ढोले, डॉ विलासराव भांबुरकर, दादासाहेब पाटील, सुखराम आखरे, बाळासाहेब पाटील, साहेबराव सोनमाळे, पुरुषोत्तम दहे , सुरेश पाटील आढे, Adv. विश्वासराव नेरकर, रमेश पाटील कोकाटे, माधवराव खोटरे , शौकत अली मिर साहेब आसिफ अली मिर साहेब, अरविंद भोपळे , सुधीर बापू देशमुख , प्रा उदय देशमुख, उद्धवराव विखे, शामशिल भोपळे , प्रमोद काळमेघ मुख्याध्यापक प्राचार्य डॉ गोपाल ढोले यांनी केले आहे.
या खेळाडूंना मार्गदर्शन शांतीकुमार सावरकर क्रिडा शिक्षक यांनी केले तर प्रोत्साहन सौ प्रेरणाताई कराळे मॅडम, अंकेश भांबुरकर , धनंजय भंगाळे यांनी दिले आहे. विजयी खेळाडू यांना सर्व शिक्षक , शिक्षिका , शिक्षकेतर कर्मचारी वर्ग , विद्यार्थी , माता , पालक मंडळी यांनी हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button