महाराष्ट्र

नवक्रांती शिक्षक व पदवीधर संघटना;महाराष्ट्र राज्य आयोजित राज्यस्तरीय क्रांतियोद्धा पुरस्काराने विजय मनोहर घोडे सन्मानित.

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस ठाणे जिल्हा प्रतिनिधी प्रफुल्ल पहुरकर दि. 22/09/24 यंदाच्या राज्यस्तरीय क्रांतियोद्धा पुरस्कार युवा पत्रकार तसेच तेल्हारा तालुका प्रतिनिधी विजय मनोहर घोडे यांची निवड करण्यात आली आहे. शिक्षण. कलावंत. आरोग्य. समाजसेवा. पोलीस. पत्रकारिता. आदर्श शाळा. अंगणवाडी सेविका. यांना देण्यात येतो. तेल्हारा तालुक्यातील युवा पत्रकार विजय मनोहर घोडे यांचे विशेष आणि मोलाचे कार्य पाहून त्यांना हा पुरस्कार देण्यात येणार आहे. शासकीय कामात ज्या गोरगरीब जनतेला माहिती नाही. जसे अन्न पुरवठा विभाग ज्यांचे किंवा ज्यांना शासकीय कामातली कोणतीच माहिती नसलेल्या गरीब लोकांना ज्यांचे 6/7 महिन्यापासून कामे रखडली आहेत. सर्वे होत नाही. अस्या अनेक समस्यांना गरिबाला सामोरे जावे लागते. या सर्व समस्या त्यांनी स्वतः समजून घेऊन निसूल्क कामे त्यांनी करून दिली. तसेच गोरगरीब जनतेसाठी ते किती कठीबद्ध आहेत हे दाखवून दिले. तसेच गोरगरीब जनतेला होणारी शासकीय कामातील पिळवणूक त्यांनी त्यांच्या प्रयत्नातून कमी केली. तसेच वृक्ष रोपण आणि संवर्धन याला सुद्धा त्यांनी विशेष रित्या जनतेला पटवून दिले. रक्तदान शिबीर यामध्ये सुद्धा त्यांचा सहकार्य नेहमीच असते. ते सुद्धा एका सामान्य कुटूंबातील असून गरीब व्यक्तीला किती संकटाणा सामोरे जावे लागते हे त्यांना चांगलेच माहित आहे. म्हणून त्यांची हीच उल्लेखनीय कामगिरी त्यांना त्या पुरस्कारासाठी पात्र ठरवते हे हेरून त्यांना येंदाचा राज्यस्तरीय क्रांतियोद्धा पुरस्कार देण्यात येत आहे. (याचे सर्व श्रेय ते त्यांची आई ‘ त्यांचे सर्व स्नेही मंडळी सर्व कार्यरीत पत्रकार संपादक व त्याच्यावर जीवापाड प्रेम करणाऱ्या गरीब जनतेला देतात.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button