मुलं रडल्यावर त्याला मोबाईल देता? थांबा! आधी ही बातमी वाचा, तज्ञ काय म्हणतात…. होऊ शकते मोठे नुकसान.

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी
प्रकाश दांडगे (जळगाव जामोद)
जळगाव जामोद: होय…. हल्ली मुलं रडायला लागली की त्याच्या हातात पालक मोबाईल देतात, पुढच्या क्षणाला रडणार बाळ त्या मोबाईल मध्ये गुंग होऊन जात.. तेवढ्या वेळासाठी बाळाचे रडणे थांबल्याने पालकांना दिलासा मिळत असला तरी अशा सवयीमुळे बाळाचे भविष्यात काय वाढवून ठेवलय याची कल्पना बाळाच्या पालकांना नसते.. मात्र याचे घातक परिणाम आता समोर येऊ लागले असून नकळत्या वयात मुलांना मातृभाषेचा विरळ पडणे, मानसिक आणि शारीरिक विकास थांबणे, सामाजिक आणि कौटुंबिक भावनांना न समजणे असे विपरीत परिणाम मुलांवर होत आहेत. त्यामुळे लहान मुलांना मोबाईलचा अतिरिक्त वापरावर कंट्रोलच हवा असा सल्ला बालरोगतज्ञ देत आहेत.
बाळ रडायला लागला की तो शांत व्हावे म्हणून त्याच्या हातात मोबाईल दिला जातो. मात्र हाच मोबाईल अनेक मुलांचे आयुष्य उध्वस्त करतो आहे. मोबाईल मुळे मुलांचे विचार करण्याची आणि समजून घेण्याची क्षमता कमी होत आहे. ते रिल्स मधून मातृभाषेवजी चिनी, जपानी हे शिकत आहेत. डॉक्टर आता रिलीज च्या भाषेतून त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करत आहेत. जास्त स्किन टाईम असल्याने मुले ” ऑटिझम” या घातक आजाराला बळी पडत असल्याचे बालरोग तज्ञांची म्हणणे आहे. मुले रील्स पाहत असल्याने आई-वडिलांना देखील मुलांची भाषा समजायला अडचण निर्माण होत आहे.



