Uncategorized

कवठळ तालुका संग्रामपूर येथील गणेश मिरवणूक शांततेत संपन्न


स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस संग्रामपूर तालुका प्रतिनिधी भगवान पाखरे
दि 7/9/2024ला गणेश मूर्तीची स्थापना करण्यात आली स्थानिक मारुती संस्थांमध्ये बजरंग दल शाखा कवठळ च्या वतीने गणेश मूर्तीची स्थापना मंडळाचे अध्यक्ष पांडू भाऊ लंगोटे यांचे हस्ते करण्यात आली तर गोविंद महाराज मंदिरामध्ये संस्थांचे अध्यक्ष चेतन चांडक यांच्या हस्ते विधिवत पूजा करून गणेश मूर्तीची स्थापना करण्यात आली गणपती विसर्जनाच्या आधी बजरंग दल शाखा कवठळ च्या वतीने विशाल अशा भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले आणि गणपती विसर्जनानंतर संध्याकाळी गोविंद महाराज मंदिरामध्ये विशाल अशा भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले कवठळ हे गाव संवेदनशील म्हणून दप्तरी नोंद असल्यामुळे तामगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार राजेंद्र जी पवार साहेब आपल्या पोलीस ताफ्यासह सकाळपासूनच कोठळ गावात दाखल झाले होते कवठळ बीट चे बीट जमादार सुशीर साहेब यांचा दीड वर्षाच्या कालावधीत गावचा चांगला अभ्यास झाल्यामुळे त्यांनी मंडळांना वेळी वेळी भेट देऊन
मार्गदर्शन केले शिवाय शांतता टिकून ठेवण्यासाठी त्यांनी गावचे आजी-माजी पोलीस पाटील रमेश जी गांधी यांना शांतता टिकून ठेवण्यासाठी बोलावून घेतले मिरवणूक दुपारी दोन वाजल्यापासून ते संध्याकाळी सात वाजेपर्यंत चालवली मिरवणूक शांततेत पार पाडण्यासाठी ठाणेदार राजेंद्रजी पवार सोनवणे साहेब सुशीर साहेब गवांदे साहेब मेंहेंगे साहेब व आदी पोलीस कर्मचारी बांधव यांनी चोक बंदोबस्त ठेवला ✍️

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button