बुलढाणामलकापूरमहाराष्ट्रविदर्भ

माहेर वरून पैसे आणण्यासाठी विवाहितेचा छळ पतीसह तिघांवर गुन्हा

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस

श्याम पहूरकर

शेगाव । माहेरून पैसे आणण्यासाठी विवाहितेचा शारिरीक व मानसिक छळ केल्याप्रकरणी पतीसह तिघांविरोधात शेगाव पो.स्टे.ला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सौ. आरती सागर भटकर (२६) रा. व्यंकटेशनगर शेगाव ह.मु. दिग्रस ता. पातुर जि. अकोला यांनी शहर पो.स्टे.ला दिलेल्या
फिर्यादीनुसार, त्यांचे पती सागर जगन्नाथ भटकर यांनी व सासरे जगन्नाथ भटकर, सासू कस्तुरा जगन्नाथ भटकर व ननंद कु. प्रणाली भटकर यांनी फिर्यादीला माहेरवरून घर खर्चासाठी व गाडी घेण्यासाठी ८० हजार रूपये घेऊन ये असे म्हणून शारिरीक व मानसिक त्रास दिला व अंगावरील कपडे फाटेपर्यंत गच्ची दाबून
मारहाण केली. तसेच जीवाने मारण्याची धमकी दिली. याशिवाय फिर्यादीला सांभाळण्याची कुठलीही मानसिकता दाखविली नाही. याप्रकरणी सौ. आरती सागर भटकर यांचे फिर्यादीवरून शेगाव पोलिसांनी पती, सासू, सासरे, ननंद सर्व रा. व्यंकटेशनगर शेगाव यांचेविरूध्द कलम ८५, ११५(२), ३५२, ३५१(२) (३), (५) भारतीय न्यायसंहिता नुसार गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोहेकॉ संजय करूटले हे करित आहेत

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button