Uncategorized

विघ्नहर्ता गणेश मंडळा च्या वतीने

जिल्हास्तरीय मॅरेथॉन २.० चे मालेगाव येथे आयोजन

वाशिम जिल्हा प्रतिनिधी
अजय गायकवाड

मालेगाव : – स्थानिक मालेगाव येथे विघ्नहर्ता गणेश मंडळाच्या वतीने केवळ गणेश उत्सवापुरतेच मर्यादित नसून ते तर वर्षी पूर्ण वर्षभर विविध उपक्रम राबवत असते. कधी ते रक्तदान शिबिराचे आयोजन करतात तर कधी मोफत आरोग्य तपासणी करतात. कधी गरजू गरीब होतकरू लोकांना आरोग्याच्या सोयी पुरवतात तर कधी अन्नदान करतात. दि. ८ सप्टेंबर २०२४ ला मंडळाने आरोग्य शिबिराचे आयोजन केले आणि ते यशस्वी देखील झाले. त्यानंतर आता दि. १५ सप्टेंबर २०२४ रोजी सकाळी ६:०० वाजता जिल्हास्तरीय मॅरेथॉन स्पर्धा २.० चे आयोजन केले आहे. स्पर्धा तीन गटात पार पडणार आहे. गट पहिला – खुला गट (पुरुष) वय १६ ते ४५ वष. ‘यामध्ये तीन बक्षीस असणार आहेत. प्रथम बक्षीस – ५००१ रुपये, द्वितीय बक्षीस – ४००१ रुपये आणि तृतीय बक्षीस ३००१ रुपये. गट दुसरा (महिला / मुली ) वय १६ ते ४५ वर्ष र्यामध्ये तीन बक्षीस असणार आहेत. प्रथम बक्षीस – ४००१ रुपये, द्वितीय बक्षीस – ३००१ रुपये आणि तृतीय बक्षीस २००१ रुपये. गट तिसरा (लहान मुलं ) वय १० ते १५ वर्ष . या मध्ये तीन बक्षीस असणार आहेत. प्रथम बक्षीस – ३००१ रुपये, द्वितीय बक्षीस – २००१ रुपये आणि तृतीय बक्षीस – १००१ रुपये. स्पर्धेत प्रवेश मोफत असणार आहे. प्रवेशासाठी खालील नं. वर संपर्क करा. गजानन काळे ७३५०२०२०१०, मंगेश गौरकर ७०५८६६०३६२, नवीन अवचार ७७९८४६४२०७, उदय तोंडे ९०९६५४६५२१, पुष्पम शिंदे ९०६७५ ९ ८ ४ ३५, नागेश गरकळ ९३७३३३०७५३. स्पर्धेचे ठिकाण- पोलीस स्टेशन समोर मालेगाव जि. वाशिम येथून स्पर्धेला सुरुवात होणार आहे. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी खालील नियम व अटी आहेत. १) – नोंदणीसाठी आधार कार्ड अनिवार्य आहे. २) नोंदणीसाठी वेळ दि. १४ सप्टेंबर २०२४ संध्याकाळी ६:०० वाजेपर्यंत असेल. ३) वेळेवर नोंदणी करता येणार नाही. ४) नोंदणी फॉर्म भरून सोबत आणावे. ५) सहभागी र होणाऱ्या प्रत्येक स्पर्धाकाला प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button