“रिठद जिल्हा परिषद शाळा क्रमांक एक व दोन मध्ये स्वातंत्र्य दिन साजरा”

वाशिम जिल्हा प्रतिनिधी
अजय गायकवाड
रिसोड : – रिसोड तालुक्यातील जिल्हा परिषद क्रमांक एक व जिल्हा परिषद क्रमांक दोन या शाळेमध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी जिल्हा परिषद शाळा एक मध्ये रिठद केंद्राचे केंद्रप्रमुख हनुमान बोरकर सर यांच्या हस्ते झेंडावंदन करण्यात आले. शाळेचे मुख्याध्यापक राजेंद्र आरु मार्गदर्शनासाठी उत्सव साजरा करण्यात आला यावेळी गावातील सेवानिवृत्त सैनिक यादवराव बोरकर, माजी पोलीस पाटील शंकर पाटील, खरेदी-विक्री संचालक आत्माराम आरु, तालुकाप्रमुख नारायण आरू, तंटामुक्ती अध्यक्ष भीमराव बोरकर, पंचायत समिती सदस्य गजानन गजानन आरु,तलाठी मुठाळ, गावातील नागरिक, अंगणवाडी सेविका, मदतनीस, व शाळेतील शिक्षक वृंद यावेळी उपस्थित होत्या.
जिल्हा परिषद शाळा क्रमांक दोन येथे शाळेचे मुख्याध्यापक संदीप आरु यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. असून यावेळी शाळा समितीचे अध्यक्ष व सर्व सन्माननीय सदस्य आणि अढळनगरातील सर्व पालक वर्ग, अंगणवाडी सेविका व मदतनीस व शाळेतील साबळे सर, इंगोले
मॅडम स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी उपस्थित होते. दोन्ही शाळेतील विद्यार्थ्यांनी प्रभात फेरी काढली व त्यानंतर झेंडावंदन करण्यात आले.




