Uncategorized

तहसील चौकातील पान टपरी फोडून ४५ हजाराचा मुद्देमाल लंपास, अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल!

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस प्रतिनिधी

बुलढाणा :- पान टपरी फोडून त्यातील ४५ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना शहरातील तहसिल चौकात उघडकीस आली. याप्रकरणी फिर्यादी चेतन चोपडे यांनी दिलेल्या तक्रारीवरून शहर पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.शहरातील विदर्भ हाऊसींग सोसायटी येथील चेतन गजानन चोपडे यांनी शहर पोलिसांत फिर्याद दिली की, त्यांची तहसिल चौकात पानटपरी आहे. चोरट्यांनी पानटपरी फोडून त्यातील ३६ हजार ४०० रुपयांची सुपारी, सिगारेट १२०० रुपये, गोल्ड ब्लक सिगारेट २५०० रुपये, व गल्ल्यातील रोख ४ हजार असा एकूण ४५ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल ३० जुलै रोजी लंपास केल्याच्या चेतन चोपडे यांच्या फिर्यादीवरुन शहर पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुध्द भारतीय न्याय संहिता कलम ३०५ (ए), ३३४(१) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास शहर पोलिस करीत आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button