Uncategorized
नवी मुंबई नेरुळ येथे तब्बल 7 मोबाईल फोनची चोरी

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस ठाणे जिल्हा प्रतिनिधी प्रफुल्ल पहूरकर
दि 8/8/2024
नवी मुंबई नेरुळ येथून तब्बल 7 मोबाईल फोन चोरी गेले. नेरुळ येथील एम. आई. डीसी. मध्ये आरवी इंटरप्राइसेस नावाची सेंट बनवणारी कंपनी आहे. 15/20 माणसे येथे काम करतात. येथे काम करणारा आझम शेख नावाचा तरुण सुद्धा काम करतो. त्याने कंपनी मध्ये टी टाइम झाला. आणि सर्व जण कामाला गेले याची संधी साधून लॉकर मधील 7 मुलींचे मोबाईल फोन चोरून त्याने पळ काढला सदर घटना ही सि. सि. टीव्ही मध्ये रेकॉर्ड झाली. त्याचा पोलीस स्टेशन ला रिपोर्ट दिल्या नंतर शोध घेतला असता 5 मोबाईल फोन जप्त करण्यात आले आहेत. परंतु आरोपी अजून फरार आहे. त्याचा शोध चालू आहे.



