Uncategorized

१४ वर्षीय मुलाचे अपहरण

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस

श्याम पहूरकर

शेगाव : श्रीक्षेत्र नागझरी येथील कृष्णा रामेश्वर
कराळे या १४ वर्षीय शाळळरी मुलाचे आदीत्य क्लासेस चीत्रकला चौक येथून अपहरण झाल्याची घटना २३ जुलै रोजी सायंकाळी ७.३० वाजता दरम्यान घडली. गोपाळ देविदास कराळे रा नागझरी ह. मु. धनोकार नगर शेगाव यांचा पुतण्या पीडित नामे कृष्णा रामेश्वर कराळे वय १४ वर्षे हा घरून ट्युशन क्लासला शेगाव येथे जातो असे सांगून शेगाव येथे आला असता त्याला कोणीतरी अज्ञात इसमाने काहीतरी फ स लावून पळून नेले आहे. याप्रकरणी गोपाळ देविदास कराळे यांनी शहर पोस्टेला फिर्याद दिल्यावरुन पोलीसांनी अज्ञात इसमा विरुध्द गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास पोना गाडगे हे करीत आहेत. सदर मुलाचा रंग सावळा, उंची ३ फूट ५ इंच, बांधा मजबूत केस बारीक काळे, अंगात पांढरा रंगाचा शर्ट, निळ्या रंगाची फुल पँट पाठीवर काळे रंगाची स्कूल बॅग, असे वर्णन असलेला मुलगा कोणास आढळून आल्यास शहर पोलीस स्टेशन ला संपर्क साधुन माहिती द्यावी असे आवाहन ठाणेदार नितीन पाटील यांनी केले आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button