से.ब.विद्यालय तेल्हारा येथे वन महोत्सव, अमृत वृक्ष आपल्या दारी व “एक पेड मां के नाम ” जनजागृती मोहीम सप्ताह !

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस विजय घोडे तेल्हारा ता.प्रतिनीधी
तेल्हारा दि.२३ : सेठ बन्सीधर झुनझुनवाला विद्यालय तथा महाविद्यालय तेल्हारा येथे
सामाजिक वनीकरण विभाग अकोला परिक्षेत्र तेल्हारा अंतर्गत वन महोत्सव, अमृतवृक्ष आपल्या दारी, आणि एक पेड मां के नाम ” ह्या संकल्पनेचा प्रचार व प्रसार होण्याकरिता संपुर्ण आठवडा भर विविध उपक्रम राबवित आहेत!
मा. विभागीय वन अधिकारी सामाजिक वनीकरण विभाग अकोला महेश खोरे सर यांचे अधिपत्याखाली, सुरेश वडोदे साहेब सहाय्यक वन संरक्षक सामाजिक वनीकरण विभाग अकोला यांचे निर्देशानुसार, तेल्हारा परिक्षेत्र अधिकारी सौ एस एस जैस्वाल मॅडम यांचे मार्गदर्शनात ,वन परिमंडळ अधिकारी तेल्हारा परिक्षेत्र गिरनारे साहेब यांच्या सहाय्याने नियतक्षेत्र अधिकारी तेल्हारा संजय सुईवाल साहेब यांचे देखरेखीत, व बी एम शिरभातें साहेब सह सेठ बंसीधर झुनझूनवाला विद्यालय/महाविद्यालय येथे संस्था अध्यक्ष गोपलदासजी मल्ल, सदस्य डॉ. विक्रमजी जोशी यांचे हस्ते ” वन महोत्सव, व अमृत वृक्ष आपल्या दारी, आणि एक पेड मां के नाम ” ह्या संकल्पनेचा प्रचार प्रसार होण्याकरिता आठवडा भर विविध उपक्रम राबवित आहेत!
प्राचार्य गोपाल फाफट सर से. ब. विद्यालय तेल्हारा, उप प्राचार्य वाघ सर, सुपरवाईजर राऊत सर यांच्या उपस्थितीत दि.२०/०७/२०२४ शनिवार रोजी सकाळच्या सत्रात मां सरस्वती पूजन आणि वृक्ष पूजन करून मान्यवरांची समयोचीत भाषणे झाली. त्यानंतर शिक्षक वृंद, आणि विद्यार्थ्यांकडून पर्यावरण संरक्षण शपथ घेण्यात आली, तदनंतर वृक्ष दिंडी काढून प्राचार्य गोपाल फाफट सर, संजय कुमार सुईवाल साहेब तसेच उपस्थित शिक्षक वृंदांसह उप प्राचार्य वाघ सर, विद्यार्थी वर्ग यांनी वृक्षारोपण केले. संपूर्ण आठवडा भर पर्यावरण वर निबंध स्पर्धा, निसर्गपर पोस्टर, व निसर्गपुरक रांगोळी स्पर्धेचे आयोजन असे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. या कार्यक्रमात सूत्र संचालन बनकर सर यांनी केले, तर आभार प्रदर्शन उंबरकर सर यांनी केले. कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी उंबरकर सर, बनकर सर यांनी अथक परिश्रम घेतले आणि त्यांना वनमजूर भारत वाकोडे उमरशेवडी, भिका तायडे तलई, लक्ष्मण सोलकर गायरान, राजेंद्र तायडे महाराज झरि यांनी सहकार्य केले.✍️



