जळगावा जिल्हामहाराष्ट्रमुक्ताईनगर

राजुरा शेती शिवारात वन्य प्राण्यांकडून शेती पिकांचे नुकसान शेतकरी चिंतेत:-(तालुका प्रतिनिधी प्रमोद सौंदळे)

सविस्तर वृत्त असे की
मुक्ताईनगर तालुक्यातील राजुरा शिवारात काही मेंढपाळ कुटुंबांकडून अवैध चराईसाठी जंगलांमध्ये अतिक्रमण केलेले आहे त्यामुळे वन्य प्राण्यांनी आपला मोर्चा हा शेत शिवाराकडे वळवल्याचे चित्र अलीकडे दिसत आहे त्यामुळे शेतकऱ्यांचे शेतीपिंकाचे वन्य प्राण्यांकडून अतोनात नुकसान होत असल्याने शेतकरी चिंतेत सापडला असून गेल्या गेल्या काही दिवसांपासून शेतकऱ्यांनी शेती पिंकची लागवड करून त्यांना खत पणी घालून हजारो रुपये खर्च करून शेतकरी आपले पिके उत्पादन झाले पाहिजे आणि दोन पैसे शेतकऱ्यांच्या घरात आले यासाठी रात्र दिवस धावपड करून पिकांचे संगोपन करतो मात्र वन्य प्राणी रान डुक्कर, हरीण,काळवीट,नीलगाय, रोहीटे,अश्या वन्य प्राण्यांमध्ये शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान होत असून यास शासनाकडून मात्र तोकडी मदत मिळत असून शेतकरी वन्य प्राण्यापासून हवलदील झाला आहे.

राजुरा ५५६,५५७ कंपार्टमेन्ट मध्ये वनविभागाच्या हद्दीत मेंडपाळ, व पावरी यांनी केलेल्या अवैध अतिक्रमण केल्यामुळे हजारो हेक्टर वरील वरील वृक्ष तोड केली असून जंगलामध्ये माणसांच्या अधीवासामुळे, व वाढते अतिक्रमणामुळे वन्यप्राणी यांच्या मोर्चा गावाकडे व शेतिशिवाराकडे धाव असल्याने शेती पिंकाचे प्रचंड नुकसान होत आहे यामुळे शेतकरी हवालदिलं झाला आहे. या अवैध मेंढपाळांवर वनविभागाचे अधिकारी आणि कर्मचारी कारवाई का करत नाही का काही हितसंबंधापोटी अधिकारी आणि कर्मचारी यांना पाठीशी घालत आहे का? काही दिवसांपूर्वीच वनविभागाच्या कर्मचाऱ्यावर सुद्धा हल्ला करण्यात आला यावर कारवाई का झाली नाही? यामध्ये काही हितसंबंध आहे का अधिकाऱ्यांवर कुठला दबाव आहे का? अशी शेतकऱ्यांमध्ये आणि परिसरामध्ये चर्चा सुरू आहे..

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button