महाराष्ट्रशैक्षणिक

तेल्हारा येथील पत्रकार व त्यांच्या पाल्यांचा अकोला येथे सत्कार!

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस विजय घोडे तेल्हारा तालुका प्रतिनिधी

तेल्हारा दि.२४; मराठी पत्रकार परिषद संलग्न अकोला जिल्हा पत्रकार संघातर्फे शनिवार दि.२० जुलै २०२४ रोजी अकोला येथील पन्नालाल जी शर्मा सभागृह पत्रकार भवन, निमवाडी येथे पत्रकारांच्या गुणवंत पाल्यांचा गौरव अकोला जिल्ह्याचे नवनिर्वाचित खा. अनुपदादा धोत्रे, आ.वसंत खंडेलवाल व माजी मंत्री अजहर हुसेन, मराठी पत्रकार परिषद चे माजी अध्यक्ष सिद्धार्थ शर्मा, अकोला जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष शौकत अली मिरसाहेब, सरचिटणीस प्रमोद लाजुरकर, किशोर बिडवे साहेब, जेष्ठ पत्रकार प्रल्हादराव ठोकणे, किर्तीकुमार वर्मा यांच्या उपस्थितीत करण्यात आला.

यावेळी तेल्हारा तालुका पत्रकार संघाचे पदाधिकारी प्रशांत विखे यांना मानाचा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले तसेच अकोला जिल्हा पत्रकार संघाचे सहचिटणीस सत्यशील सावरकर यांची कन्या कु. सत्यार्थी सत्यशील सावरकर हिला (सीईटी ९६.६५ %) व तेल्हारा तालुका पत्रकार संघाचे पदाधिकारी प्रा विद्याधर खुमकर यांचे चिरंजीव आर्य खुमकर (दहावी ८८%),कोठा वितरक मंगेश अहेरकर यांची कन्या कु. मधुरा अहेरकर दहावी ९४% यांचा गुणगौरव सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. या प्रसंगी तेल्हारा तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रल्हादराव ठोकणे, सुरेशराव शिंगणारे, सत्यशील सावरकर, प्रशांत विखे, प्रा.विद्याधर खुमकर, अनिल अवताडे, राहूल मिटकरी उपस्थित होते. जिल्ह्यातील ९ मान्यवर पत्रकार व २५ गुणवत्ता प्राप्त विद्यार्थी या सर्व गुणवंतांचे तेल्हारा तालुका पत्रकार संघातर्फे अभिनंदन करण्यात आले.✍️

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button