जे ई स्कूल आणि ज्यू कॉलेज मध्ये “शिक्षण सप्ताह ला” सुरुवात.:- (तालुका प्रतिनिधी प्रमोद सौंदळे)

राष्ट्रीय शिक्षण धोरण२०२० च्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त दिनांक २२ ते २८ जुलै, २०२४ या कालावधीत “शिक्षण सप्ताह” साजरा करणेबाबत केंद्रीय शिक्षण मंत्रालयामार्फत कळविण्यात आले आहे.त्या नुसार मा.उपसचिव शालेय शिक्षण विभागाने दि १६/७/२०२४ च्या परिपत्रक नुसार साजऱ्या होणाऱ्या शिक्षण सप्ताहात आठवडयाचा प्रत्येक दिवस एका विशिष्ट उपक्रमासाठी नियोजित करण्यात आला असून, यामध्ये शिक्षण व विकासाच्या विविध पैलूंचा समावेश आहे हा शिक्षण सप्ताह विद्यार्थी, शिक्षक, धोरणकर्ते व भागधारक यांच्यामध्ये सहकार्य वाढविणारा ठरणार आहे.शिक्षण सप्ताहामध्ये खालीलप्रमाणे उपक्रम रावण्याबाबत सूचित करण्यात आलेले आहे.
२२/७/२०२४ सोमवार अध्ययन अध्यापन साहित्य दिवस (TLM Day)
२३/७/२०२४ मंगळवार मुलभूत संख्याज्ञान व साक्षरता दिवस (FLN Day)
२४/७/२०२४ बुधवार क्रीडा दिवस (Sports Day)
२५/७/२०२४ गुरुवार सांस्कृतिक दिवस (Cultural Day)
२६/७/२०२४ शुक्रवार कौशल्य व डिजिटल उपक्रम दिवस (Skilling and Digital Initiatives Day)
२७/७/२०२४ शनिवार मिशन लाईफच्या दृष्टीक्षेपात इको क्लब उपक्रम / शालेय पोषण दिवस (Eco Clubs for Mission LiFE/ School Nutrition Day)
२८/७/२०२४ रविवार समुदाय सहभाग दिवस (Community involvement Day)
या प्रमाणे सप्ताह साजरा करायचा असल्याने ,आज पहिल्या दिवशी अध्ययन अध्यापन दिवसा निमित्त विद्यार्थ्यांनी भित्तीपत्र,खेळणी,शैक्षणिक साहित्य,मुखवटे, कथापत्रक या सारखे अप्रतिम साहित्य मुलांनी बनवून मोठ्या संख्येने सहभाग घेतला. संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन श्री एस आर ठाकूर यांनी केले तर आज चा उपक्रम एच बी बाऊसकर आणि भोळे मॅडम यांनी घेतला.मुख्याध्यापक श्री आर पी पाटील यांनी मार्गदर्शन केले तर उपमुख्याध्यापक श्री जे जे पाटील,पर्यवेक्षक एस पी राठोड, व्ही डी बऱ्हाटे यांची उपस्थिती होती.प्रसंगी सर्व सहकारी शिक्षक व शिक्षकेतर बंधू भगिनींनी सहकार्य केले.



