आयजीच्या पथकाने 76 लाखांचा गुटखा पकडला
प्रतिनिधी प्रमोद सौंदडे
मालक जळगावचा, सहा जणांवर गुन्हा दाखल, चालक ताब्यात
। मुक्ताईनगर।अवैधरित्या कंटेनरमधून वाहतूक होत असलेला गुटखा नाशिक आयजी पथकाच्या पोलिसांनी मुक्ताईनगर येथे शनिवारी, 20 जुलै रोजी सकाळी सहा वाजता पकडला. कंटेनरसह गुटखा असा एक कोटी सहा लाख रुपयाचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केलेला आहे. या कारवाईमुळे गुटखा तस्करांचे धाबे दणाणले आहेत. महाराष्ट्रात बंदी असलेला गुटखा अवैधरित्या कंटेनरमधून कोटा राजस्थान येथून भरून येत असलेला पानमसाला गुटखा मुक्ताईनगरमार्गे महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यात जात असताना नाशिक पोलीस महानिरीक्षक (आय जी) यांच्या पथकाने मुक्ताईनगर तालुक्यातील बन्हाणपूर चौफुली येथे 20 जुलै रोजी पहाटे सहा वाजेच्या सुमारास कंटेनरची तपासणी केली. तेव्हा त्यात गुटख्याच्या गोण्या आढळून आल्या. पोलीस पथकाने कंटेनर मुक्ताईनगर पोलीस ठाण्यामध्ये
मध्यप्रदेशातून मुक्ताईनगरकडे अवैधरित्या वाहतूक होत असलेल्या गुटख्याची गोपनीय माहिती नाशिक विभागाचे पौलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराडे यांना मिळाली होती. आयजी कराडे यांच्या पथकाने मुक्ताईनगर गाठत 20 जुलै रोजी पहाटे कोटा राजस्थान येथून डाक पार्सल लिहिलेल्या बंदिस्त कैटेनर (क्र. एचआर 55 एक्यू 3873) ची बुहाणपूर चौफुली येथे चौकशी केली. त्यात प्लास्टिकच्यापान मसाला आणि गुटखा आढळून आला.पोलिसांनी मिळालेल्या मालाची मोजणी केल्यावर 76 लाख 17 हजार 800 रुपयाचा गुटखा व तीस लाख रुपये किमतीचे कंटेनर असा एक कोटी सहा लाख 17 हजार 800 रुपयाचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केलेला आहे. याप्रकरणी आयजी पथकाचे पोलीस नाईक प्रमोद मंडलिक यांच्या फिर्यादीवरून दिलीप बदलानी (रा. जळगाव), संतोष रा.दिल्ली), त्यागी (रा. जयपूर), मुबारक, नीलू पंजाबी (रा. भिवाडी, राजस्थान) आणि चालक लियाकत अली इस्लाम खान (रा. हरियाणा) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक नागेश मोहिते करीत आहे
घाऊक विक्रेत्यांवर ठोसकारवाई करावीविधानपरिषद आ. एकनाथराव खड़से आणि विधानसभेचे आ. चंद्रकांत पाटील यांनी वेळोवेळी सभागृहात अवैध गुटख्याच्या संदर्भात आवाज उठविला होता. याकडे जिल्हा पोलीस अधीक्षकांनी लक्ष देत जिल्ह्यातील गुटख्याच्या घाऊक विक्रेत्यांवर ठोस कारवाई करावी, अशी
मागणी होत आहे.लोकप्रतिनिधींनी पकडूनदिला होता गुटखा….मध्यप्रदेशातून मुक्ताईनगरमार्गे मोख्या प्रमाणात अवैधरित्या गुटख्याची तस्करी होत असल्याचे उघड आहे. एका वेळेस आ.एकनाथराव खडसे यांनी मुक्ताईनगर येथील बोदवड चौफुली चौकात अवैधरित्या गुटख्याची गाडी पोलिसांना पकडून दिली होती. यामध्ये 56 लाखाचा गुटखा होता तर आ.चंद्रकांत पाटील यांनी संत मुक्ताबाई महाविद्यालयाजवळ बन्हाणपूरकडून येणान्या आणि गुटखा वाहून नेणाऱ्या वाहनाला पकडून दिले होते. त्यात 21 लाखाचा गुटखा होता.
तेरी भी चूप मेरी चूप’मध्यप्रदेशातील बुन्हाणपूरकडून महाराष्ट्रातील मुक्ताईनगरकडे येताना रस्त्यामध्ये मध्यप्रदेशातील व महाराष्ट्राच्या सीमेवर दोन चेक पोस्ट आहेत. अवैधरित्या गुटख्याची व अन्य अमली पदार्थांची वाहतूक करणारे ही वाहने चेक पोस्टवरून पास होतात तरी कशी? हा प्रश्न असून की तस्करी व्यापाऱ्यांना दुसरी चोरटी वाहतूक करणारे रस्ते ‘तेरी भी चूप मेरी चूप’ असे म्हणत मिळत असतील, यात शंका नाही.



