Uncategorized

मान्सून २०२४ ,नैसर्गीक आपत्तीत तेल्हारा तहसीलदार समाधानजी सोनवणे यांचे तालुक्यातील जनतेला आवाहन!

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस विजय घोडे तेल्हारा तालुका प्रतिनिधी

तेल्हारा : – मान्सून २०२४ याकाळात नैसर्गिक आपत्ती (अतिवृष्टी, पुर, विज पडणे, झाडे पडणे, दरड कोसळणे) इ. घटना घडण्याची संभावना असते. अशा परिस्थितीत तालुका आपत्ती व्यवस्थापन समिती , तहसील कार्यालय तेल्हारा तर्फे तालुक्यातील सर्व नागरिकांना याद्वारे आवाहन करण्यात येते की, नागरीकांनी सदर घटनांच्या काळात सुरक्षीत रहावे, त्याकरिता तालुक्यातील नागरिकांनी पुढील सूचनांचे पालन करावे. सखल भागात राहणाऱ्या नागरिकांना तातडीने सुरक्षित स्थळी स्थलांतर करावे, नदी नाले व ओढया काठच्या नागरिकांनी सतर्क रहावे, पाणीपातळीत वाढ होत असल्यास नागरिकांनी नदीपात्रापासून तसेच ओढे व नाले यापासून दुर रहावे व सुरक्षित स्थळी स्थलांतर करावे, नदी अथवा नाल्यावरील पुलांवरुन पाणी वाहत असल्यास पुल ओलांडू नये, पूर पाहण्यासाठी गर्दी करुन नये, जुनाट किंवा मोडकळीस आलेल्या इमारतीत आश्रय घेवु नये, अतिवृष्टीमुळे भुस्खलन होण्याची व दरड कोसळण्याची शक्यता असते. धरण व नदीक्षेत्रामध्ये पर्यटनासाठी जाणाऱ्या नागरिकांनी विशेष खबरदारी घ्यावी, नदीच्या पाणीपातळीत वाढ झाल्यास जिवीतास धोका उद्भवू शकतो, धोकादायक ठीकाणी चढ अथवा उतरु नये, धोकादायक ठीकाणी सेल्फी काढू नये, पुरपरीस्थीतीत जनावरांचा बचाव करणे शक्य नसल्यास त्यांना बांधून ठेवू नये,
मेघगर्जना होत असतांना झाडांच्या खाली न थांबता सुरक्षित स्थळी आश्रय घ्यावा,

नागरिकांनी आपल्या मोबाईल मध्ये “दामिनी एँप ” चा वापर करावा. दामिनी एँपमुळे विज पडण्याची पुर्व सूचना प्राप्त होते. आपत्ती काळात नागरिकांनी अत्यंत महत्वाच्या कामकाजा शीवाय घराबाहेर पडून नये. आपत्तीमध्ये जखमी झालेल्या नागरिकांच्या उपचारासाठी गावामध्ये उपचार उपलब्ध असल्यास जखमीवर तात्काळ डॉक्टरी सल्ल्याने उपचार करावेत, आपत्तीमुळे प्रभावीत झालेल्या नागरिकांना सामाजिक बांधीलकी म्हणून मदत करावी.

मान्सून २०२४ च्या अनुषंगाने तहसिल कार्यालय तेल्हारा येथे “नैसर्गिक आपत्ती नियंत्रण कक्ष” स्थापन करण्यात आला असून सदर नियंत्रण कक्षाचा दूरध्वनी क्रमांक ७७७५८४७७४१ असून आपत्कालीन परिस्थीती उद्भवल्यास सदर क्रमांवर फोनद्वारे कळवावे. तसेच गावातील तलाठी, ग्रामसेवक, कृषीसहायक, पोलीस पाटील यांना तात्काळ कळवावे. उपरोक्त नमुद सर्व सूचनांचे पालन करुन प्रशासनास सहकार्य करावे. असे आवाहन तेल्हारा तहसीलदार समाधानजी सोनवणे यांनी याव्दारे तालुक्यातील जनतेला केले आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button