महाराष्ट्रविदर्भसामाजिक

बौद्ध समाजातील युवकावरील भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ

प्रातीनिधी :_विजय घोडे

बौद्ध समाजातील युवकावरील भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ

रोजी मोर्चा काढून पोलीस जिल्हा अधीक्षक अकोला यांना बौद्ध समाज संघर्ष समितीच्या वतीने निवेदन देण्यात आले, महाराष्ट्रातील प्रचंड हे भाडेहल्ले दिवसान दिवस वाढत चालले आहेत,गृहमंत्र्याची मुख्यमंत्र्याची दलित हत्याकांडवर आतापर्यंत एकही भूमिका नाही.दलित हत्याकांडवर एकही नेता बोलायला तयार नाही दलितांबद्दल एवढा जातीय द्वेष कशासाठी.?.आजही चातुर्वर्ण व्यवस्थेचा मनुस्मृतीचा कायदा तुम्हाला मान्य आहे का?. आजही आम्हाला माणूस म्हणून जगता येत नाही हा देश संविधानावर चालते की हुकूमशाहीवर याचे उत्तर गृहमंत्र्यांनी द्यावं.?.महाराष्ट्र राज्य दंगलखोर आणि जातीय दंगली देशातून सगळ्यात जास्त महाराष्ट्रात घडले दंगलखोर महाराष्ट्र म्हणून याची ओळख निर्माण झाली याची लाज वाटले पाहिजे,हाच का तो,छत्रपती,फुले,शाहू,आंबेडकरांचा महाराष्ट्र.?.हे कुठेतरी थांबलं पाहिजे यावर योग्य भूमिका घेऊन हा कलंक महाराष्ट्रातून मिटवला पाहिजे,माणूस म्हणून आम्हाला जगू दिले पाहिजे,आजही जातीय द्वेष भावनेतून आमच्यावर प्राणघात हल्ले होतात असाच हल्ला.बौद्ध युवकांवर झाला या दोन्हीही प्राणघातक हल्ल्याच्या घटनेच्या निषेधार्थ मोर्चा काढण्यात आला या मोर्चात जिल्ह्यातील समस्त युवा भीमसैनिक वृद्ध महिला सामील होऊन,आरोपांना अटक करा,जातिवाद नही चलेगा असे घोषणा देऊन,जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालय येथे या दोन्ही गंभीर स्वरूपाचे घटनेतील आरोपींना अटक करा यासाठी निवेदन देण्यात आले आहे,पहिली घटना दोन अडीच महिन्यापूर्वी रामदास पेठ पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या एका घटनतेत देशमुख फ़ैल निवासी साक्षांत तेलगोटे यांच्या काही अज्ञात समाजकंटक इसमाने जीवे मारण्याच्या उद्देशाने प्राणघातक हल्ला केला व तेल्हारा तालुक्यातील भांबेरी येथील अक्षय भोजने या युवकांवर जातीय द्वेषातून गंभीर स्वरूपात प्राणघातक हल्ला करण्यात आला.या दोन्ही घटनेने बौद्ध समाजात गंभीर वातावरण निर्माण झालं सदर घटनेतील आतापर्यंत अकोला पोलीस प्रशासन कडून कुठल्याही प्रकारची कारवाही किंवा हल्लेखोराना अटक करण्यात आली नाही,आम्ही मागणी करतो की तात्काळ सर्व आरोपी अटक करून या दोन्ही युवकांना न्याय मिळवून देण्याचे काम करावे हे आम्ही बौद्ध समाज संघर्ष समितीच्या वतीने मागणी करतो अन्यथा यापेक्षा मोठे तीव्र आंदोलन संपूर्ण महाराष्ट्रभर आम्ही केल्याशिवाय राहणार नाही हा इशारा देतो आणि या घटनेचा आम्ही जाहीर तीव्र निषेध करतो, बौद्ध समाज संघर्ष समिती अकोला. ,आकाश दादा शिरसाट,

जय भीम

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button