बुलढाणाविदर्भ

१४ वर्षीय अल्पवयीन मुलीला पळवून नेल्याची पोलिसांत तक्रार

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस

श्याम पहूरकर

शेगाव । शहरातील १४ वर्षीय मुलीला कोणीतरी अज्ञात इसमाने पळवून नेल्याची तक्रार मुलीच्या आईने शहर पोलिसांत दिली असून पोलिसांनी तक्रारीवरून अज्ञात इसमाविरूध्द गुन्हा दाखल केला आहे. या घटनेसंदर्भात मोदीनगर येथील फिर्यादी महिलेने शहर

पो.स्टे.ला तक्रारी दिल्यानुसार त्यांची १४ वर्षीय मुलगी ही ७ जुलै रोजी सकाळी १०.३० ते दुपारी १.३० वाजता सुमारास मैत्रिणीला बोलावून आणण्यास जाते असे सांगून घरून निघुन गेली असता ती घरी परतली नाही. तिचा सर्वत्र शोध घेतला परंतु ती मिळून आली नाही. यावरून

कोणीतरी अज्ञात इसमाने तिला पळवून नेले असा संशय फिर्यादीने व्यक्त केला असून फिर्यादीच्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात आरोपीविरूध्द कलम १३७ (२) बीएनएस नुसार गुन्हा दाखल केला असून घटनेचा तपास पोहेकॉ निलेश गाडगे हे करित आहेत.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button