बुलढाणामहाराष्ट्रविदर्भ

शेगाव तालुक्यातील नुकसान झाले त्याची प्रत्यक्ष जाऊन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विदर्भ अध्यक्ष प्रशांत डिक्कर यांनी पाहणी केली !

(स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस प्रतिनिधी शेगाव मिलिंद चराटे)

जवळा (पळसखेड) व महागाव गावाच्या मधोमध असलेल्या नदीच्या पुराने रौद्ररुप धारण केल्याने पुराचे पाणी गावात शिरले, त्यामुळे शेतकरी बांधवांचे भविष्यात भरुन न निघणारे नुकसान झाले आहे.अनेक घरे उद्ध्वस्त झाली, कित्येक घरांची पडझड झाली, काही घरात पुराचे पाणी शिरल्याने घरातील साहित्य अन्नधान्य सर्वच वाहून गेले आहे. तसेच शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले असून शेकडो एकर जमिनी खरडून निघाल्याने शेतकरी पूर्णपणे खचून गेले आहेत.

गावातल्या प्रत्येक घराघरांमध्ये व शेतांमध्ये जाऊन प्रशांत डिक्कर यांनी जाऊन तेथील पाहणी केली.शेतकरी आणि माय माऊलींना मायेचा आधार दिला.संबंधित अधिकाऱ्यांना सांगून मदतीसाठी पंचनामे तयार करण्याची त्यांच्याकडे मागणी केली.
हा आपला ‘प्रशांत भाऊ’ कायम आपल्या सोबत असेल अशी ग्वाही स्थानिक गावकऱ्यांना दिली.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button