Uncategorized

जळगावातील तरुणाची ऑनलाईन टास्कच्या नावावर ८ लाखात फसवणूक

जळगाव स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस | ६ जुलै २०२४शहरातील सिध्दीविनायक नगरातील खासगी व्यवसाय करणाऱ्या एका ३० वर्षीय मुलाची ऑनलाईन टास्कच्या नावावर तब्बल ८ लाख ७६ हजार ३६३ रुपयांची फसवणूक केल्याची घटना १ जूलै रोजी उघडकीस आली आहे. या प्रकरणी गुरूवारी ४ जुलै रोजी रात्री ८.३० वाजता जळगाव सायबर पोलीस ठाण्यात अज्ञात मुलीवर विरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मिळालेल्या माहितीनुसार, सिध्दीविनायक नगरात अमोल दिलीप बिरारी (वय ३०) हा तरूण आपल्या कुटुंबासह वास्तव्याला आहे. अमोल हा खासगी व्यवसाय करतो, २२ जून ते १ जुलै दरम्यान या युवकाची फसवणूक करण्यात आली. फिर्यादीत दिलेल्या माहितीनुसार इलेक्ट्रॉनिक्स माध्यमांचा वापर करुन निमीशा रघुराम असे नाव सांगणाऱ्या महिलेने तिच्या टेलीग्राम खात्यावरुन अमोलच्या टेलीग्राम खात्यावर संपर्क साधला तसेच पार्टटाईम जॉब देण्याचे आमीष दिले. तसेच रॅक अॅप ५२५३ या टेलीग्राम चॅनलकडून संपर्क साधून ८ लाख ७६ हजार ३६३ रुपये स्विकारुन, त्या रक्कमेतून एकही रुपयाची परतफेड केली नाही.दिलेली रक्कम परत मिळत नसल्यानंतर, अमोलला आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यानुसार अमोल बिरारी याने जळगाव सायबर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार गुरूवारी ४ जुलै रोजी रात्री ८.३० वाजता जळगाव सायबर पोलीस ठाण्यात नीमीशा रघुराम नावाच्या अज्ञात मुलीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक दत्तात्रय निकम हे करत आहेत.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button