Uncategorized

“राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त “सामाजिक न्याय दिन संमेलन” ! विविध उपक्रमांनी जयंती साजरी.

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस विजय घोडे प्रतिनिधी

अकोला :- महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत दरवर्षी राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती “सामाजिक न्याय दिन” म्हणून २६ जून या दिनी संपूर्ण राज्यभर साजरी केल्या जाते. यावर्षी १५० व्या जयंतीनिमित्त सामाजिक न्याय विभागामार्फत २६ जून २०२४ ते ०२ जुलै २०२४ या कालावधीत “सामाजिक न्याय दिन संमेलन सप्ताह” म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात हा जयंती उत्सव साजरा करण्यात आला.
सदर उपक्रम अकोला जिल्हात सहा.आयुक्त समाजकल्याण कार्यालय तसेच डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे अंतर्गत “समतादूत प्रकल्प” अकोला जिल्हा यांचे माध्यमातून मोठ्या उत्साहात विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला.
बार्टी मुख्यालय,पुणे तसेच सहाय्यक आयुक्त समाजकल्याण अकोला यांच्या मुख्य मार्गदर्शनाखाली सदर उपक्रमाअंतर्गत अकोला जिल्हात संपूर्ण आठवडा समतादूत प्रकल्पामार्फत राजर्षी छत्रपती शाहू महाराज यासह भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर, राष्ट्रपिता म.ज्योतिबा फुले तसेच इतर थोर महापुरुषांच्या विचारांवर आधारित प्रबोधन कार्यक्रम व विविध स्पर्धांचे जिल्हा व तालुका पातळीवर आयोजन करण्यात आले होते.
दि. ०२ जुलै २०२४ रोजी “सामाजिक न्याय दिन संमेलन सप्ताह” या उपक्रमाचा समाजकल्याण च्या मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह, मित्रनगर, अकोला येथे जिल्हास्तरावर समारोप करण्यात आला.
या समारोपीय कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून श्रीमती मंगला मुन मॅडम सहा.आयुक्त समाजकल्याण, अकोला ह्यांची प्रामुख्याने उपस्थिती लाभली होती यासह प्रमुख व्याख्याते म्हणून जेष्ठ साहित्यीक तथा कवी डी.जे.वानखडे सर हे लाभले होते. कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून श्री.उमेश वाघ स.क.नि.समाजकल्याण अकोला, श्रीमती व्ही.बी.कुलकर्णी गृहपाल, श्रीमती एस.एस.लव्हाळे गृहपाल यांचेसह बार्टी चे जिल्हा प्रकल्प अधिकारी विजय बेदरकर, उज्वल भटकर क.लिपिक इ.मान्यवरांची उपस्थिती लाभली होती.
सदर कार्यक्रमाला मुख्य व्याख्याते म्हणून लाभलेले श्री.डी.जे.वानखडे सर यांनी राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जिवनकार्यावर आधारीत विस्तृत असे व्याख्यान दिले तद्नंतर अनुक्रमे उपस्थित मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करत सदर शासकीय उपक्रमाला शुभेच्छा दिल्या.प्रसंगी कार्यक्रमात सहभागी विद्यार्थीनींनी जिल्हास्तरीय निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, गितगायन स्पर्धेत आपला उस्फुर्त सहभाग नोंदवला व मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे स्वीकारली.
कार्यक्रमाच्या शेवटी श्रीमती मंगला मुन मॅडम सहाय्यक आयुक्त समाज कल्याण, अकोला यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतातुन सदर उपक्रमाचे महत्व पटवून देत उपस्थितांना अतिशय मोलाचे मार्गदर्शन केले त्याचबरोबर “सामाजिक न्याय दिन संमेलन सप्ताह” २०२४ यशस्वी करण्यासाठी ज्यांनी ज्यांनी सहकार्य केले त्या सर्वांचे कार्यालयाच्या वतीने आभार मानले तद्वतच बार्टी च्या अकोला जिल्हा समतादूत टीम सदस्यांचे विशेष कौतुक करत त्यांना उपक्रम यशस्वीतेसाठी शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी अकोला तालुका समतादूत मनेश चोटमल,तेल्हारा तालुका समतादूत श्रीमती शुभांगी लव्हाळे, बार्शीटाकळी तालुका समतादूत विनोद शिरसाट, अकोला तालुका समतादूत ॲड . श्रीमती वैशाली गवई यांचे सह वसतिगृहाच्या समस्त कर्मचारी भगिनी तसेच विद्यार्थिनी उपस्थित होत्या.याप्रसंगी भारतीय संविधान उद्देशिका व बार्टी प्रकाशन विभागाची पुस्तके तसेच सामाजिक न्याय विभागाची माहिती पत्रके उपस्थितांना वितरित करण्यात आली.
सदर कार्यक्रमाचे आयोजन सहा आयुक्त समाजकल्याण अकोला यांच्या सहकार्याने बार्टी, पुणे समतादूत प्रकल्प – अकोला जिल्हाच्या माध्यमातून करण्यात आले होते. समारोपीय कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन मूर्तिजापूर तालुका समतादूत श्रीमती स्मिता राऊत तसेच आभार प्रदर्शन बार्शीटाकळी तालुका समतादूत उपेंद्र गावंडे यांनी केलं

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button