हरताळा फाट्याजवळ सापडलाअनोळखी इसमाचा मृतदेह ओळख पटविण्याचे पोलिसांचे आवाहन :- (स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस मुक्ताईनगर प्रतिनिधी प्रमोद सौंदळे)

सविस्तर वृत्त असे की मुक्ताईनगर तालुक्यातील हरताळा शिवारातील मुंबई ते नागपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 53 वरील चंद्रोदय पेट्रोल पंप समोर कोणीतरी अज्ञात वाहनाने धडक दिल्यामुळे एक अनोळखी व्यक्तीचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांना मिळताच घटनास्थळी जाऊन मृतदेह ताब्यात घेतला मृत व्यक्ती अंदाजे वय 40 ते 50 वर्ष रंगाने निमगोरा उंची साधारण पाच फूट पाच इंच तसेच उजव्या हाताचे कामेवर मानसी नाव गोंदलेले अंगात फुलबाहीचे राखाडी नारंगी रंगाचे त्रिकोणी डिझाईन असलेले शर्ट राखाडी रंगाची फुल पॅन्ट डोक्यावर केस बारीक व बारीक दाढीअसलेला मृतदेह मिळून आलेला आहे तरी मयत इसमाची ओळख पटवण्याचे आवाहन पोलिसांनी केलेले आहे सौ स्नेहल प्रदीप काळे पोलीस पाटील हरताळा यांच्या फिर्यादीवरून कलम 106(2 ), 281, मो ,वा, का, कलम 134 ( ब) 184 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राहुल बोरकर करत आहेत



