कृषी दूतांचे मानेगाव येथे आगमन :-(स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस प्रतिनिधी प्रमोद सौंदळे)

डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालय, जळगाव येथील अंतिम वर्षातील विद्यार्थी पुढील चार महिन्यासाठी मानेगाव या गावात राहणार असून त्यांनी शेतकऱ्यांना माती परीक्षण, एकात्मिक कीड नियंत्रण, रोग नियंत्रण, भाजीपाला लागवड, फळबाग लागवड नियंत्रण, शासनाच्या विविध योजना, तसेच महिला बचत गट, इ पीक पाहणी ॲप इ.. प्रकारच्या सर्व माहिती व नवीन तंत्रज्ञान कसे आत्मसात करावे या विविध विषयी माहिती देण्यासाठी ग्रामीण जागरूकता कार्यानुभव कार्यक्रम २०२४-२०२५ यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शैलेश तायडे, कार्यक्रम समनव्यक प्रा. बी. एम. गोणशेटवाड, कार्यक्रम अधिकारी प्रा. एन.बि. सदार व संबंधित विषयातील विषय विशेषतज्ञ यांच्या मार्गदर्शनाखाली नामे हेमंत महाजन, भूषण पाटील, विशाल पाटील, विशाल जाधव, उल्केश बोरसे, उदयराज भदाणे या गावात दाखल झाले असून. ग्रामपंचायत मानेगाव व सर्व ग्रामस्थ यांच्या वतीने या विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले.यावेळी गावचे उपसरपंच माननीय श्री. राजेंद्र पाटील ग्रामपंचायत सदस्य उपस्थीत होते. हा उपक्रम गावकऱ्यांच्या उपस्थित पार पडणार आहे.



