बुलढाणामहाराष्ट्रविदर्भ

तेल्हारा येथे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती व लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथी निमित्य…

तेल्हारा येथे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती व लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथी निमित्य…

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस व्ही एम घोडे तेल्हारा तालुका प्रतिनिधी

तेल्हारा दि.1ऑ. लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे बहुउद्देशीय शिक्षण संस्था तेल्हारा द्वारा संचालित सार्वजनिक वाचनालय तेल्हारा येथे एक ऑगस्ट 2023 रोजी साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांची 103 जयंती उत्साहात साजरी करण्यात आली तथा लोकमान्य टिळक यांची 103 वी पुण्यतिथी निमित्त त्यांना अभिवादन करण्यात आले.
आज तेल्हारा येथील मातंग समाजाच्या वतीने साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे जयंती निमित्त शासकीय ग्रामीण रुग्णालयामध्ये फळ व बिस्किटे वाटप करून अण्णाभाऊ साठे वाचनालयात गोरगरीब मुला-मुलींना शालेय साहित्य वाटप करण्यात आले तसेच या ठिकाणी मातंग समाजाचे प्रसिद्ध शायर गोविंदा यांनी अण्णाभाऊ साठे यांचे कार्य आपल्या मनोगतातून व्यक्त केले व बालकांना विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले तसेच मातंग समाजाचे वानखडे यांनी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचा रशियातील प्रसंग आपल्या मनोगतातून व्यक्त केला तसेच ग्रंथ मित्र रामेश्वर पोहेकर यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अण्णाभाऊ साठे बाळ गंगाधर टिळक वीर वस्ताद लहुजी साळवे या महापुरुषांचे जीवन चरित्र वाचून आचरणात आणणे काळाची गरज आहे असे त्यांनी आपल्या मनोगतातून स्पष्ट केले व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले सामाजिक कार्यकर्ता निलेश भाऊ पुदाखे यांनी जयंती निमित्त सर्व नागरिकांना शुभेच्छा दिल्या तथा लोकमान्य बाळ गंगाधर टिळक पुण्यतिथी निमित्त अभिवादन केले कार्यक्रमाची सुरुवात छ शिवाजी महाराज भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर वस्ताद वीर लहुजी साळवे साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या प्रतिमेचे पूजन तथा दीप प्रज्वलन हार पुष्प अर्पण करून त्यांना अभिवादन केले समारंभाच्या अध्यक्षस्थानी श्यामलालजी बघ्घन तर प्रमुख अतिथी म्हणून तेल्हारा नगरपरिषद अधीक्षक मयुरी आचार्य कृ उ बा समिती सभापती सुनील इंगळे नगरपरिषद शाळा मुख्याध्यापक सिद्धार्थ तायडे शिवसेनेचे प्रवीण दादा वैष्णव शहर अध्यक्ष अनिकेत ढवळे व्ही एम घोडे सत्यशील सावरकर ढोकणे साहेब शिंगणारे सर संजय आढाव रामेश्वर पोहेकर सर तथा लहुजी सेनेचे सदस्य उपस्थित होते उपरोक्त मान्यवरांचा शाल व श्रीफळ देऊन बाळाभाऊ वानखडे बबन दुतोंडे माजी सरपंच बाबुराव वानखडे यांच्या शुभ हस्ते शाल श्रीफळ देऊन गौरव करण्यात आला यावेळी चांदभाई विठ्ठल आढाव सामाजिक कार्यकर्ते निलेश किसनराव पुदाखे प्रकाश दिघे लोकशाहीर आण्णाभाऊ साठे बहुउद्देशीय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष नागोराव वानखडे कैलास भटकर बबन दुतोंडे बापूराव वानखडे बाळाभाऊ वानखडे संजय धुरंदर सदाभाऊ हागे आकाश जासनपुरे उदय पळसकार अक्षय वानखडे मयूर वर्मा शिवराम गिरी शुभम इंगळे निखिल हिवराळे ज्ञानेश्वर ढेंगे अभिजीत पात्रीकर आदित्य इंगळे कापसे काका गोविंदा काका तसेच असंख्य मातंग समाजातील सदस्य उपस्थिती होते. कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन ग्रंथमित्र रामेश्वर पोहेकर यांनी केले व सर्व उपस्थित त्यांचे आभार संस्थेचे अध्यक्ष नागोराव वानखडे यांनी मानले

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button