जळगाव येथील वीर सावरकर रिक्षा युनियन तर्फे रिक्षा तंदुरुस्ती प्रमाणपत्र उशिरासाठी रोज पन्नास रुपये दंडास स्थगिती देण्याबाबत निवेदन….

जळगावं- दिनांक 01 जून २०२४ रोजी आटो रिक्षा संघटना संयुक्त कृती समिती, महाराष्ट्र पदाधिकारी तथा वीर सावरकर रिक्षा युनियन जिल्हाध्यक्ष दिलीप भाऊ सपकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाधीकारी यांना केंद्र सरकारची अधिसूचना क्रमांक जीआर 1183(इ) 16/12/2016 . नुसार रिक्षा तंदुरुस्ती प्रमाणपत्र उशिरासाठी रोज 50 रु शुल्क लागू केले आहे.त्याला मुंबई मालक चालक संघटनेने उच्च न्यायालयात आव्हान दिले होते नुकतीच न्यायलयाने ही याचिका खारीज केली आहे .त्यामुळे 17 मे 2024 रोजी राज्यांच्या परिवहन आयुक्तांनी परिवहन वाहनाच्या योग्यता प्रमाणपत्रासाठी रोज 50 रु लागू करण्याचे आदेश दिले आहेत.
रिक्षा चालक हे निम्न आर्थिक गटातील आहेत त्यांच्या रोजच्या निव्वळ उत्पन्नात पन्नास रुपये ही खूप मोठी रक्कम आहे आणि जसे दिवस जातील तसे रक्कम वाढत जाते इतक्या मोठ्या दंडामुळे योग्यता प्रमाणपत्र घेण्याचे प्रमाण आणखी कमी होईल . दुरुस्ती किंवा योग्यता प्रमाणपत्र वाहनांनी वेळेवर घेतले पाहिजे ही बाब तत्वतः मान्य आहे मात्र ते घेतले नाही म्हणून झालेला उशिरासाठी रोज पन्नास रुपये दंड ही फार मोठी रक्कम आहे. त्यामुळे रोगापेक्षा इलाज जालीम असे होत आहे निवेदनात तुर्त केंद्र सरकारच्या मूळ परिपत्रकाला स्थगिती मिळावी, सध्या तंदुरुस्ती प्रमाणपत्र न घेतलेल्या रिक्षांना ते घेण्यासाठी मुदत मिळावी आणि त्या मुदतीनंतर तंदुरुस्ती प्रमाणपत्र उशिरासाठी जाचक होणार नाही इतपत रक्कम आकारावी, रोज रुपये 50 चा दंड रद्द करावा यासाठी आपण प्रयत्न करावे ही विनंती सचिव ,परिवहन विभाग, मुंबई यांना जिल्हाधिकारी जळगाव यांच्या मार्फत निवेदन देऊन करण्यात आले आहे. तसेच जर योग्य तो निर्णय घेण्यात नाही आला तर केंद्र सरकार विरुद्ध मोठे जनआंदोलन छेडण्याचाही इशारा संघटनेकडून देण्यात आलेला आहेे यात देशभरातील सर्व रिक्षा युनियन, चालक-मालक संघटना, ट्रान्सपोर्ट संघटना , इ .सहभागी होणार आहेत आणि लोकप्रतिनिधींना स्थानिक पातळीवर अटकाव करून घेराव घालणार आहेत.सदर निवेदन हे केंद्र परिवहन मंत्री श्री नितीन गडकरी ,मुख्यमंत्री महाराष्ट्र ,पालकामंत्री, खासदार,आमदार, जळगाव यांना देण्यात येणार आहे.
निवेदनासाठी स्थानिक संघटनाचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते यात भानुदास गायकवाड, कैलास विसपुते , वाल्मीक सपकाळे , शशिकांत किरण , किरण मराठे ,अनिल शिंगटे ,पोपट ढोबळे ,गणेश शिंदे , भारत वाघ, सचिन चौधरी , संजय पाटील ,अहिरराव ,गणेश खैरनार किशोर पाटील ,मंगेश पाटील ,प्रवीण पाटील ,प्रकाश पाठक ,विलास पाटील, सुनील चौधरी ,सोमनाथ गायकवाड, गणेश शिंपी, दीपक जाधव ,राजू भगवान, राजेश गोपाळ ,भास्कर शिरसाळे ,नथू सावळे ,प्रवीण घुगे ,लक्ष्मण सोनवणे ,गजानन जाधव ,किरण कोळी, हेमंत चौधरी ,भगवान पाटील ,सचिन पाटील ,दिलीप पाटील ,पंकज जाधव ,सागर पाटील ,हर्षल गायकवाड ,योगेश धनगर ,संजय सोनार ,रमेश निकम, नरेंद्र जाधव ,राजेंद्र सोनवणे ,जाधव पाटील , हेमंत चौधरी, फकीरा मनोहर, मनोहर पाटील ,धनराज चौधरी , एकनाथ बारी ,रवी जाधव ,राजेंद्र जाधव ,देवा तायडे, दीपक जोशी, तानाजी वशीत, आर आर दिलीप, मनोज वाघ अमोल कोल्हे इ उपस्थित होते.



