मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना.

(स्टार भारत लाईव्ह स्पेस प्रतिनिधी शेगाव मिलिंद चराटे)
दरमहा १५००/- रुपये दिले जाईल.
योजनेची लाभार्थी:- महाराष्ट्र राज्यातील 21 ते 60 वर्षे वयोगटातील विवाहित, विधवा, घटस्फोटीत , परित्यक्त्या आणि निराधार महिला.
ऑनलाइन अर्ज प्रक्रिया 1 जुलै ते 15 जुलै
कागदपत्रे:-(१) योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन अर्ज.
(२) लाभार्थ्याचे आधार कार्ड.
(३) महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र/महाराष्ट्र राज्यातील जन्म दाखला
(४) सक्षम प्राधिकारी यांनी दिलेला कुटुंब प्रमुखांचा उत्पन्नाचा दाखला
(वार्षिक उत्पन्न रु.२.५० लाखापर्यंत असणे अनिवार्य).
(५) बँक खाते पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत.
(६) पासपोर्ट आकाराचा फोटो.
(७) रेशनकार्ड.
(८) सदर योजनेच्या अटी शर्तीचे पालन करण्याबाबतचे हमीपत्र.
तसेच…
महाराष्ट्र शासन जुलै 2024 पासुन म्हणजेच पुढच्या महिन्या पासुन 21-60 वयोगटातील सर्व महिलांना दर महिना रुपये 1500/- त्यांच्या बँक खात्यात जमा करणार आहे.
आता या योजनेचा लाभ घेण्यासाठी बँक खाते आणि DBT लिंकिंग असणे गरजेचे आहे..



