मुंबई ते पातुर्डा. डॉ बाबासाहेब आंबेडकर(स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस प्रतिनिधी शेगाव मिलिंद चराटे )

मुंबई ते पातुर्डा. डॉ बाबासाहेब आंबेडकर(स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस प्रतिनिधी शेगाव मिलिंद चराटे ) हे दिनांक 28/ 5 /1929 रोजी डॉ. बाबासाहेब हे पातुर्डा तालुका संग्रामपूर येथे महाड परिषदेसाठी आले असता. जलंब रेल्वे स्टेशनवर उतरले होते. दिनांक 29/ 5/ 1929 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे येत आहेत म्हणून तेल्हारा येथील टाले पाटील यांनी आपली स्वतःची चार चाकी गाडी बाबासाहेबांसाठी आणली होती. टाले पाटील यांनी बाबासाहेब व त्यांचे सहकारी गाडीत बसविले व पातुर्डा या गावी जाण्यासाठी निघाले होते. रस्त्यात जात असताना पहूरपूर्णा नदी मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची गाडी चिखलात फसली होती. तेव्हा बाबासाहेब त्या सहकाऱ्यांना म्हणाले मी गाडी लुटू का? तेव्हा ते सहकारी बाबासाहेबांना म्हणाले. गाडी आम्ही लोटतो तुम्हाला समाज लोटायचा आहे. बाबासाहेब पाथरूड येथे पोहोचले व जिल्हा परिषद शाळेच्या एका खोलीमध्ये त्यांचा दोन दिवस मुक्काम होता. योगायोगाने त्याच गावात परिषद संपल्यावर बाबासाहेबांनी आठवडी बाजारातील विहीर अस्पृश्यांसाठी विहीर खुली केली दिनांक 30 /5 /1929 रोजी बक्षीराम दाभाडे यांच्या मुलीचे लग्न होते. ते दाभाडे बाबासाहेबांचे सहकारी होते. बाबासाहेबांच्या उपस्थितीत ते लग्न लागले होते. ( मुलीचे नाव कौतिक बाई दाभाडे ) असे होते बाबासाहेबांचा येण्या जाण्याचा रेल्वेचा खर्च वारणा तालुका खामगाव येथील एक श्रीमंत व्यक्ती रूपाजी इंगळे यांनी रेल्वे तिकीट चे व्यवस्था केली होती. बाबासाहेबांनंतर त्या पावन भूमीवर आंबेडकर घराण्यातील बहुजनाचे कैवारी एडवोकेट बाळासाहेब आंबेडकर अंजलीताई आंबेडकर मीराताई आंबेडकर भीमराव आंबेडकर असे एकूण पाच आंबेडकर व्यक्तींचा पदस्पर्श झालेला हे पवित्र असे पातुर्डा गाव त्या पावन भूमीला माझे विनम्र अभिवादन.



