Uncategorized

अंडेरा पोलीस स्टेशन हद्दीतील गावांमध्ये चोरट्यांचा सुळसुळाट; शेतीसंबंधी साहित्य केले लांपास! साहेब बळीराजाच्या तक्रारीकडे दुर्लक्ष नको, शेतकऱ्यांची विनवणी…

(चिखली): चिखली तालुक्यातील अंढेरा पोलीस स्टेशन हद्दीतील विविध गावांमध्ये अज्ञात चोरट्यांचा सुळसुळाट सुरू आहे. देऊळगाव घुबे, मिसाळवाडी, भरोसा, कोनड या गावांमध्ये घरफोडीच्या तसेच शेतीसंबंधी साहित्य चोरी गेल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. दरम्यान, मिसाळवाडी येथून एकाच रात्री चार शेतकऱ्यांचे स्पिंकलर तोट्या चोरी झाल्याची घटना आज २८ मी च्या सकाळी उघडकीस आली. शेतकऱ्यांनी ही बाब अंढेरा पोलीस यांना कळवली असून शेतकऱ्यांच्या या तक्रारीकडे लक्ष देऊन अज्ञात चोरट्यांचा छडा लावा अशी मागणी होत आहे.
मिसाळवाडी येथील शेतकरी राजू मिसाळ यांच्या शेतातील स्पिंकलरच्या १२ तोट्या, नारायण गुरुजी यांच्या १३ भरत भगत यांचे १० तर सतीश भगत यांच्या स्प्रिंकलर मधील ९ तोट्या चोरी झाल्याचे सकाळी समजले. त्यानंतर संपूर्ण मिसळवाडी परिसरात एकच खळबळ उडाली. वारंवार होतं असलेल्या चोरीच्या घटना चिंता वाढवणारी बाब असल्याचे शेतकऱ्यांच्या लक्षात आले असून त्यांनी शेतातूनच अंधेरा पोलिसांशी संपर्क केला आणि सगळी हकीकत सांगितली.✍️

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button