तेल्हारा येथे १५ मे ला छत्रपती संभाजी महाराज जयंती निमित्ताने रक्तदान शिबीराचे आयोजन!

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस विजय घोडे तेल्हारा तालुका प्रतिनिधी
तेल्हारा दि.१५ मे ; डांगरा संकुल जवळील डॉक्टर महेश बोबडे यांच्या समर्थन हॉस्पिटल तेल्हारा येथे आज दि. १५ मे छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंती निमित्ताने सायंकाळी ६:०० वाजता भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे
आकोला जिल्ह्यातील शासकीय सेवा खाजगी रक्तपेढी मध्ये उन्हाळा असल्याने मोठ्या प्रमाणावर रक्ताचा तुटवडा निर्माण झालेला आहे त्यामुळे गरजु लोकांना रक्त मिळविण्यासाठी वणवण फिरावे लागत आहे . त्याकरिता मानव सेवा हीच ईश्वर सेवा या युक्तीप्रमाणे तेल्हारा येथील समर्थन हॉस्पिटल द्वारा सामाजिक बांधिलकी, जबाबदारी, जोपासत तेल्हारा येथे बुधवारी १५ मे रोजी रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे . तुम्हीही रक्तदान करून एखाद्या व्यक्तीचा , बांधवाचा जिव वाचवु शकता म्हणून मोठ्या संख्येने रक्तदान करा तसेच या राष्ट्रीय व महान कार्यास आपण आपले रक्त देवुन सहकार्य करावे असे आवाहन तेल्हारा येथील समर्थन हाॅस्पिटलचे डॉ. महेश बोबडे यांनी केले आहे.



