Uncategorized

बॅनर, पोस्टर ,जाहिरात बाजी, फटाके काहीच नको!वाढदिवसाला कोणताही वायफळ खर्च न करण्याचे रविकांत तुपकर यांचे आवाहन

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
जिल्हा प्रतिनिधी
उषा इंगळे बुलढाणा

(बुलढाणा): वाढदिवस हा एखाद्या उत्सवासारखा साजरा करून विनाकारण उधळपट्टी करण्याची सध्या प्रथाच पडली आहे. परंतु मी कधीच माझा वाढदिवस साजरा करत नाही.
त्यामुळे माझ्या सर्व चाहत्यांनी, कार्यकर्ते व हितचिंतकांनी माझ्या वाढदिवसानिमित्त कोणताही वायफळ खर्च करू नये, असे आवाहन शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी केली आहे. बॅनर, पोस्टर, जाहिरात बाजी, फटाके किंवा इतर कोणत्याही पद्धतीचा इव्हेंट करू नये, अशी विनंती रविकांत तुपकर यांनी केली आहे.
शेतकरी नेते रविकांत तुपकर यांचा १३ मे रोजी वाढदिवस आहे. वाढदिवस साजरा करणे त्यांना पटत नाही, गेल्या २२ वर्षापासून चळवळीत काम करत असताना सर्वसामान्य जनता, तरुण, व महिला समाजातील सर्वच घटकांसाठी रविकांत तुपकरांनी लढा दिला आहे. बुलढाणा जिल्हात नवी तर राज्यभरात रविकांत तुपकरांचे चाहते, हितचिंतक आणि जीवाभावाचे कार्यकर्ते व मित्रपरिवार आहे. परंतु असे असले तरी आजवर त्यांनी कधीच आपला वाढदिवस थाटामाटात साजरा केला नाही. पूर्वी वाढदिवसाच्या दिवशी ते अज्ञातवासात असायचे परंतु हितचिंतक, कार्यकर्ते नाराज होतात म्हणून काही वर्षांपासून ते आपल्या बुलढाणा येथील स्वाभिमानी हेल्पलाइन सेंटर येथे उपस्थित राहून सर्वांच्या शुभेच्छा स्वीकारतात, थोरामोठ्यांचे आशीर्वाद घेतात त्यामुळे अगदी साध्या पद्धतीने त्यांचा वाढदिवस पार पडतो. शेतकरी, कष्टकरी, सर्वसामान्य जनता, तरुण आणि माय माऊल्यांचा आशीर्वाद, प्रेम हीच आपली खरी संपत्ती आणि ताकद आहे बुलढाणा लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पुन्हा एकदा या प्रेमाची प्रचिती आली. जनतेच्या प्रेमातून उतराई होणे शक्य नाही, त्यामुळे हितचिंतक आणि कार्यकर्त्यांच्या भावनांचा आदर ठेवत त्यांच्या भेटीसाठी आणि सर्वसामान्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी आपण स्वाभिमानी हेल्पलाइन सेंटर, बुलढाणा येथे उपस्थित राहणार आहोत. परंतु कार्यकर्ते, हितचिंतक, मित्रपरिवार यांनी बॅनर, पोस्टर, जाहिराती बाजी,फटाके किंवा इतर कोणत्याही पद्धतीचा वायफळ खर्च करू नये, असे रविकांत तुपकर यांनी केले आहे.✍️

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button