Uncategorized

संताप जनक ! बारा वर्षीय मुलीचा पाठलाग करत पकडले, पडक्या घरात नेले अन् नको ते केले… बोराखेडी पोलीस ठाण्यात गुन्हा

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
जिल्हा प्रतिनिधी
उषा इंगळे बुलढाणा

(मोताळा) बोराखेडी पोलीस स्टेशन हद्दीत एका १२ वर्षीय मुली सोबत चिड आणणारी घटना घडली आहे. गावातील एका तरुणाने पाठलाग करून तिचा विनयभंग केल्याची तक्रार बोराखेडी पोलिसात देण्यात आली आहे.
त्यानुसार श्रीकृष्ण सोनोने(२१ वर्ष) या युवका विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
प्राप्त माहितीनुसार, ९ एप्रिलला पोलिसात तक्रा देण्यात आली. त्यानुसार पीडित १२ वर्षीय मुलगी गावातील किराणा दुकानात सामान आणण्यासाठी गेली असता, गावातीलच श्रीकृष्ण सोनोने याने पाठलाग केला. त्यानंतर पिडीतेला एका पडक्या घरात ओढून तिला वाईट उद्देशाने मिठी मारली. यावेळी पीडित मुलीने आरडा ओरड केली असता, कुणाला काही सांगितल्यास आरोपी यांनी जीवे मारण्याची धमकी दिली असे तक्रारीत म्हटले आहे. प्रकरणी बोराखेडी पोलिसांनी श्रीकृष्ण सोनोने यांच्यावर पोस्को कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल केला. गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात महिला आत्याचाराच्या विविध घटना उघडकीस आल्या आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर वर आला आहे.✍️

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button