Uncategorized

जागेच्या वादातून एकास मारहाण

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस

श्याम पहूरकर

शेगाव : तालुक्यातील हिंगणा वैजनाथ येथे लिंबाच्या झाडाला आग का लावली असे म्हटल्याच्या कारणामुळे मारहाण झाल्याची घटना ७ मे रोजी दुपारी २ वाजता घडली. याबाबत रमेश सिताराम

श्रीनाथ वय ४५ वर्ष रा. हिंगणा वैजनाथ यांनी पोलिसात फिर्याद दिली की, माझा लहान भाऊ व आरोपी विशाल मधुकर बावणे यांचा जागेवरून वाद आहे कोर्टात प्रकरण चालू आहे. ७ मे रोजी दुपारी २ वाजता माझ्या बहिणीने मला सांगितले की आरोपीने माझ्या लहान भावाच्या घराजवळील लिंबाच्या झाडाला आग लावली त्यावर मी त्याला म्हटले की, आग का लावली त्यात माझे लहान भावाचे घर जळाले असते असे म्हटले असता आरोपी विशाल मधुकर बावणे, अभिषेक मधुकर बावणे यांनी मला शिवीगाळ केली तसेच चापटा बुक्क्यांनी मारहाण केली तसेच अभिषेक बावणे याने खाली जमिनीवर

पडलेली काठी उचलून माझ्या छातीवर मारहाण केली तर आरोपी विशाल मधुकर बावणे, अभिषेक मधुकर बावणे, रामेश्वर बावणे, दिनकर बावणे यांनी मला तुम्ही आमच्या जागेत कसे काय राहता ते पाहतो असे म्हणून शिवीगाळ करून एखाद्या दिवशी तुम्हाला जीवाने मारून टाकतो. अशी धमकी दिली व इंधन जळाल्यामुळे अंदाजे ४ ते ५ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. अशा तोंडी रिपोर्टवरून आरोपी विरुद्ध कलम ४३५, ३२४, ५०४, ५०६, ३४ भादवी नुसार गुन्हा दाखल केला आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button