
स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
जिल्हा प्रतिनिधी
उषा इंगळे बुलढाणा
(बुलढाणा): लोकसभा निवडणुकीसाठी (दुसऱ्या टप्प्यात) २६ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. दरम्यान प्रशासन यंत्रणा सज्ज झाली असून इच्छुक उमेदवारांसाठी मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आले आहे जारी करण्यात आल्या आहेत. उद्या २८ मार्चपासून ते ४ एप्रिल पर्यंत उमेदवारांना अर्ज भरता येणार आहे. बुलढाणा लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा मतदारसंघाचा समावेश होतो.
त्यामध्ये एकूण १९६२ निवडणूक केंद्र आहेत.
इच्छुक उमेदवारांना ऑनलाइन अर्ज सादर करायचे आहे, यानंतर अर्ज भरल्या नंतर प्रिंट घेऊन त्यासोबत सर्व आवश्यक ते कागदपत्रे प्रत्यक्ष निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे सुपुर्द करायचे आहे. खुल्या प्रवर्गातील इच्छुक उमेदवारांसाठी २५ हजार व मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी १२,५०० इतकी रोख रक्कम नामांकन अर्जसह भरणे आवश्यक आहे. ऑनलाइन पद्धतीचा अर्ज (suvidha.eci.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आला आहे. उमेदवारांना विविध परवानगी मिळवण्यासाठी सुविधा (suvidja) हे ॲप विकसित करण्यात आले आहे. सदर ॲपच्या माध्यमातून उमेदवार एकाच ठिकाणाहून नामनिर्देशन, सभास्थळ, लाऊड स्पीकर आदींच्या परवानग्या मिळवू शकणार आहे. निवडणुकीच्या तारखांची घोषणा झाल्यापासून आदर्श आचारसंहिता लागू झालेली आहे. त्यानुसार आचारसंहितेच्या कालावधीमध्ये कुठल्याही अनुचित प्रकारामुळे किंवा नजरचुकीने आचारसंहितेचा भंग होणार नाही. याची दक्षता घेण्याचे निर्देश देण्यात आली आहे.✍️



