बुलढाणामहाराष्ट्र

५५ वर्षीय व्यक्ती बाभळीच्याझाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस

श्याम पहूरकर

शेगाव ग्रामीण पोलीस स्टेशनच्या अंतर्गत येणाऱ्या सगोडा शेतशिवारात सगोडा येथील ५५ वर्षीय इसमाने बाभळीच्या झाडाला गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना २०/०३/२०२४ रोजी सकाळी ११:३० वाजताच्या सुमारास उघडकीस आली. याबाबत शेगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

शेगाव ग्रामीण पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार शेगांव तालुक्यातील सगोडा येथील शालिग्राम वेतकर यांनी शेगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला येऊन माहिती दिली की ते घरी हजर असतांना त्यांना पुरुषोत्तम इंगळे यांनी सांगीतले की तुमचे चुलत भाउ मारुती तुकाराम वयतकर वय ५५ वर्ष यांनी गावाच्या शेत शिवारातील बाभळीच्या झाडाला गळफास

घेतला आहे. म्हणुन प्रत्यक्ष जाउन पाहणी करून खात्री केली असता नमुद मृतक हे गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसले. अशा माहिती वरून सदरचा अकस्मात मृत्युची नोंद करण्यात करण्यात आली आहे. याप्रकरणी ठाणेदार यांच्या आदेशानुसार बीट पोहेका सुरेंद्रसिंग चव्हाण यांच्याकडे तपास देण्यात आला आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button