जळगावा जिल्हारावेर

वादळाचा कहर : झाड कोसळून तरुणाचा दुर्दैवी मृत्यूवाघोदा-निंभोरा रस्त्यावर हृदयद्रावक घटना; परिसरात शोककळा

वादळाचा कहर : झाड कोसळून तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
वाघोदा-निंभोरा रस्त्यावर हृदयद्रावक घटना; परिसरात शोककळा


वाघोदा – निंभोरा रस्त्यावरील शनिमंदिराजवळ तसेच विजय बाजीराव पाटील यांच्या शेतालगत आज दुपारी सुमारे 4.00 ते 4.30 वाजेच्या दरम्यान आलेल्या भीषण वादळाने थैमान घालत एक दुर्दैवी घटना घडली. अचानक सुटलेल्या प्रचंड वेगाच्या वाऱ्यामुळे रस्त्याच्या कडेला उभे असलेले मोठे झाड क्षणार्धात कोसळले आणि त्याचवेळी रस्त्याने मोटारसायकलवरून जात असलेल्या युवकावर झाड पडून त्यांचा जागीच मृत्यू झाला.
या दुर्दैवी घटनेत शैलेंद्र राजेंद्र मेढे (रा. रोझोदा, ता. रावेर) यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मोटारसायकलचा क्रमांक MH 19 EN 2515 असा आहे. अचानक आलेल्या वादळामुळे परिसरात मोठी धावपळ उडाली होती. त्याचदरम्यान हे झाड कोसळल्याने काही क्षणातच आनंदी वातावरणावर शोककळा पसरली.
घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. झाडाखाली अडकलेल्या शैलेंद्र मेढे यांना नागरिकांनी तात्काळ ग्रामीण रुग्णालय सावदा येथे उपचारासाठी हलविले तद नंतर ग्रामीण रुग्णालय सावदा येथील डॉक्टरांनी तपासणी करून युवकास मृत घोषित केले. ही बातमी गावात पसरताच संपूर्ण परिसर हळहळला असून नागरिकांकडून तीव्र दुःख व्यक्त करण्यात येत आहे.
सदर घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस प्रशासन, महसूल विभाग तसेच आपत्ती व्यवस्थापन विभागाने घटनास्थळी धाव घेत पंचनामा व झाड हटविण्याची कार्यवाही सुरू केली. वादळामुळे काही काळ वाहतूकही विस्कळीत झाली होती.
अचानक आलेल्या या भीषण वादळाने एका कुटुंबाचा आधार हिरावून घेतल्याने परिसरात शोककळा पसरली असून नागरिकांकडून मृत व्यक्तीस भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button