जळगावा जिल्हामुक्ताईनगरराजकीय

दिलीप वाघांसह अर्धी राष्ट्रवादी आमच्याकडे….. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा दावा

दिलीप वाघांसह अर्धी राष्ट्रवादी आमच्याकडे….. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा दावा

जळगाव प्रतिनिधी

आम्ही दूध संघाच्या निवडणुकीत एकनाथ खडसे यांच्या पावलावर पाऊल ठेवले आहे. राष्ट्रवादीचे माजी आमदार दिलीप वाघ हे आमच्याकडून बिनविरोध निवडुन आले आहेत. वाघ यांच्यासह अर्धी राष्ट्रवादी काँग्रेस आमच्याकडे असल्याचा दावा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केला आहे. तसेच आमचे पॅनल खऱ्या अर्थाने सर्वपक्षीय पॅनल असल्याचेही त्यांनी सांगितले.
जळगाव दूध संघ निवडणुक
शेवटच्या दिवशी जिल्ह्याचे राजकारण तापले आहे. माघारीनंतर गुलाबराव पाटील यांनी आपलेच भाजप व शिंदे गटाचे पॅनल विजयी होणार असल्याचा दावा केला आहे. त्यांनी सांगितले की, राष्ट्रवादीचे माजी आमदार दिलीप वाघ आमच्या पॅनलकडे आले आहेत. आमदार किशोर पाटील यांनी उमेदवारी मागे घेतल्याने वाघ यांच्या माध्यमातून एक जागा बिनविरोध झाली आहे. वाघ यांच्यासह संजय पवार, रोहित निकम, शामल झांबरे हेदेखील हेदेखील राष्ट्रवादीचे असून अर्धी राष्ट्रवादी आमच्याकडे आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button