जळगावा जिल्हामहाराष्ट्रमुक्ताईनगर

अवैद्य रेती उपसा करणाऱ्या बोटी महसूल विभाग व पोलीस विभागाच्या कारवाईने बोटी उध्वस्त.

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस

प्रतिनिधी

गजानन खिल्लारे.

संत चोखा सागर जलाशय खडकपूर्णा प्रकल्प यामध्ये अवैद्यरित्या रेती उपसा करणाऱ्या दोन बोटी महसूल व पोलीस विभागाच्या पथकाने नष्ट केल्या. तहसीलदार वैशाली डोंगरजाळ यांचे मार्गदर्शनात संत चोखासागर जलाशय मध्ये दोन बोटी अवैद्य रेती उपसा तथा उत्खनन करणाऱ्या बोटीची शोध मोहीम महसूल आणि पोलीस प्रशासनाच्या संयुक्त अधिपत्याखाली राबविण्यात आली. यामध्ये मौजे मेहुना राजा शिवारात संत चोखासागर खडकपूर्णा जलाशयाच्या काठी एक फायबर बोट व एक इंजिन बोट आढळून आली. व नंतर सदर दोन्ही बोटी जलाशयाच्या काठी सुरक्षितपणे आणण्यात आल्या व पंचा सक्षम फोडण्यात आल्या दोन्ही बोटी नष्ट करत असताना प्रत्यक्ष ठाणेदार ब्रह्म गिरी, पी आय हेमंत शिंदे, महसूल मंडळ अधिकारी विजय हिरवे, पोलीस, प्रकल्प कालवा निरीक्षक भगवान खार्डे व सुरक्षारक्षक पुरुषोत्तम भागिले, तसेच महसूल सेवक शरद काकडे, या सर्वांनी सहभाग घेऊन परिश्रम घेतले.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button