जळगावा जिल्हाबुलढाणामहाराष्ट्र
शेगाव रोकडीया नगर मधील घरासमोरून कार लंपास

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
श्याम पहूरकर
शेगाव । शहरातील रोकडीया नगरातील एका घरासमोरील कार चोरीला गेल्याची तक्रार शहर पोलीस स्टेशनला देण्यात आली आहे.
या घटनेसंदर्भात फिर्यादी विश्वंभर देवमन झाडोकार वय ६१ वर्षे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्यांच्या पवनपुत्र प्राथमिक शाळेच्या समोरून १७ जानेवारीच्या रात्री कोणीतरी अज्ञात इसमाने त्यांची एमएम १४ एइ ०३९७ क्रमांकाची जुनी मारूती अल्टो कार चोरीला गेली. तक्रारीवरून अज्ञाताविरूध्द कलम ३०३ (२) ३२४ (२) बीएनएस नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून घटनेचा पुढील तपास गणेश वाकेकर हे करित आहेत.
✍️



