महाराष्ट्र

मंडळ अधिकारी डॉ.मोहसीन शेख यांना महाराष्ट्र राज्याचा प्रथम क्रमांक पुरस्कार प्रदान.

अहमदनगर प्रतिनिधी

मंडळ अधिकारी डॉ.मोहसीन शेख यांना महाराष्ट्र राज्याचा प्रथम क्रमांक पुरस्कार प्रदान. मिरजगाव येथील रहिवाशी व राहता येथे कार्यरत मंडळ अधिकारी डॉ.मोहसीन शेख यांना महाराष्ट्र राज्याचा राजीव गांधी प्रशासकीय गतिमान अभियान व स्पर्धा यातील शासकीय कर्मचारी विभागात महाराष्ट्र राज्याचा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.महाराष्ट्राचे मुख्य मंत्री देवेंद्र फडणवीस तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. डॉ.मोहसीन शेख हे दुसऱ्यांदा पुरस्काराचे मानकरी ठरले.शेख यांनी केलेल्या राज्यातील पहिल्या क्यूआर कोड वाचनालय संकल्पनेसाठी हा पुरस्कार जाहीर करण्यात आला.या आधी देखील राहता मंडळात महसूल अर्ध न्यायिक निकाल पत्रक क्यूआर कोडचा माध्यमातून देण्याचा नाविन्यपूर्ण होता.या उपक्रमाला देखील हा बहुमान मिळाला होता.या पुरस्काराचे मानकरी शेख हे राज्यातील पहिलेच मंडळ अधिकारी ठरले आहेत.या पूर्वी महाराष्ट्र शासनाचे अहमदनगर जिल्ह्याचे आदर्श तलाठी असे पुरस्कार देण्यात आले.तसेच राज्यसतरीय युवा आयडॉल पुरस्कार तसेच उपविभागीय आदर्श कर्मचारी पुरस्कार,तसेच राज्यस्तरीय समाज रत्न पुरस्कार, आणि यशदा सर्वोत्तम मास्टर ट्रेनर नाशिक विभाग अशा अनेक शासकीय पुरस्काराने डॉ.शेख यांना सन्मानित करण्यात आले आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button