Uncategorized

अकोला जिल्ह्यातील युवा पत्रकार अमित काकड यांनी नागरिकांना सतर्क राहण्यासाठी केले आवाहन!

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस विजय घोडे प्रतिनिधी

पाथर्डी .दि.1 डिसें. 2024:- ब्लॅक मनी हाईड केल्याच्या नावावर लोन मंजूर करून तेल्हारा तालुक्यातील ग्राम पाथर्डी येथील एका युतीची लाखो रुपयाची फसवणूक केल्याची भुवया उंचावणारी खळबळ जनक घटना घडली आहे. तब्बल ०९ लाख ८० हजाराहून अधिक रुपयाची फसवणूक केल्याची घटना नुकतीच घडली असून अशा प्रकारची घटना आपल्या सोबत ही घडू शकते या अनुषंगाने सर्व नागरिकांनी सतर्क राहण्याची गरज असल्याचे आवाहन तेल्हारा तालुका येथील एका सुप्रसिद्ध वृत्त समूहाचे युवा पत्रकार अमितभाऊ काकड यांनी केले आहे.

सविस्तर वृत्त असे की अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुका अंतर्गत येत असलेले ग्राम पाथर्डी येथील एका २४ वर्षीय युवतीला कुरिअरमध्ये 124 ग्राम ड्रग्स पाठवल्याची बतावणी करत फिर्यादीच्या आय.सी.आय.सी.आय. बँक खात्यामध्ये ब्लॅक मनी असल्याचे सांगून फिर्यादी यांचे आय.सी.आय.सी.आय. बँक शाखा अकोटचे सॅलरी अकाउंट खाते क्रमांक 186301003780 मध्ये 9 लाख 81 हजार 151 रुपयांचे लोन करून त्यामधून 09 लाख 80 हजार 701 एक रुपये बँक खात्यात ट्रान्सफर करण्यास लावून फिर्यादी यांची ऑनलाइन फसवणूक करत विश्वासात केला आहे. तेल्हारा तालुक्यातील ग्राम पाथर्डी येथील एक युवती पुणे येथील कोर्स पाच इंटेलिजन या खाजगी कंपनीमध्ये मध्ये डेटा अनालिस्ट म्हणून काम करते व सध्या वर्क फ्रॉम होम म्हणून घरीच राहून कंपनीचे कामकाज पाहते व फिर्यादीचे आय.सी.आय.सी.आय बँक शाखा अकोट येथे 186301003780 या क्रमांकाचे खाते असून यातील फिर्यादीस गुरुवार दिनांक 28 नोव्हेंबर रोजी 6976578064 या क्रमांकावरून फोन आला असता यातील आरोपीने फेडेक्स कुरिअर सर्विस मधून बोलत असून माझे नाव – राकेश एम व एम्पलोयी आय.डी. क्रमांक ए.डी.एक्स.- 1058 आहे असे सांगितले तसेच सदर कुरिअर सर्विस मध्ये फिर्यादी यांच्या नावाने दिनांक 11 नोव्हेंबर 2024 रोजी मुंबई ते इराण करिता तुमचे आधार कार्ड वापरून कुरिअर पार्सल करण्यात आले आहे. सदरचे कुरियर 06 किलो वजनाचे असून त्यामध्ये 2 पासपोर्ट, 5 क्रेडिट कार्ड,1 लॅपटॉप, 4 किलो कपडे तसेच 124 ग्राम एम.डी.एम.ए. ड्रग्स असून फिर्यादीच्या आय.डी. चा कोणीतरी वापर केला आहे असे सांगून फिर्यादीला आम्हास ऑनलाईन व्हेरिफिकेशन करावे लागेल असे म्हणून त्याकरिता फिर्यादीला सहकार्य करावे लागेल जर फिर्यादीने सहकार्य केले नाही तर फिर्यादी विरुद्ध केस करावी लागेल असे खोटे सांगून आय.सी.आय.सी.आय बँक शाखा अकोट येथील खात्याची पूर्ण माहिती घेऊन फिर्यादीच्या खात्यामध्ये ब्लॅक मनी हाईड करून ठेवली असल्याबाबत यातील आरोपीने फिर्यादी सांगून आय मोबाईल या ऑनलाइन ट्रांजेक्शन ॲप चेक करण्यास सांगितले व त्यामधील लोन व रिवार्ड मध्ये दहा ते अकरा लाख रुपये लोन ऑफर होते त्यांनी फिर्यादीस सदरहू ॲप मधील अव्हेल या ऑप्शनवर क्लिक करण्यास सांगितले व नंतर प्रोसिड करण्यास सांगितले यातील फिर्यादीने घाबरून आरोपीने सांगितले त्यानुसार फिर्यादी ही ऑनलाइन प्रक्रियेची कार्यवाही पूर्ण करत गेली त्यामुळे यातील फिर्यादीला 9 लाख 81 हजार 151 रुपयांचे लोन मंजूर झाले तेव्हा आरोपीने ते लोन नसून ब्लॅक मनी आहे असे खोटे सांगितले व आरोपीने दिलेल्या वेगवेगळ्या अकाऊंटवर ते पैसे पाठविण्यात सांगितले त्यामुळे फिर्यादीचे नावाचे आय.सी.आय.सी.आय बँक शाखा अकोटचे सॅलरी अकाउंट खाते क्रमांक 186301003780 मध्ये 9 लाख 81 हजार 151 रुपये लोन करून त्यामधून 9 लाख 80 हजार 701 रुपये विश्वासघात करत नमूद बँक खात्यातून ट्रान्सफर करण्यास लावून यातील फिर्यादीची ऑनलाईन फसवणूक करत विश्वासघात केला आहे अशा फिर्यादीच्या रिपोर्टवरून तेल्हारा पोलिसांनी भारतीय न्याय सहितेच्या विविध कलमा सह माहिती तंत्रज्ञान अधिनियम कलमान्वये गुन्हा दाखल करून माननीय पोलीस अधीक्षक अकोला, उपविभागीय पोलीस अधिकारी अकोट यांचे मार्गदर्शनाखाली सायबर पोलीस स्टेशन यांच्या मदतीने पुढील तपास तेल्हारा पोलीस करीत असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून प्राप्त झाली आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button